मुंबई : लहान मुलं ही गोंडस आणि तेवढीच निरागसही असतात. त्यांनी केलेले कृत्यही तेवढेच शोभून दिसते. शिवाय ते कधी काय करतील हे सांगताही येत नाही. (Social Media) सोशल मिडियाचा वापर वाढल्यापासून लहान (Littel Boy) मुलांचे मजेशीर किस्से आता समोर येत आहेत. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या (Teacher) शिक्षेकेला समजावण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, हे करीत असताना शिक्षिकेचा वाढलेला पाराही त्याच्या लक्षात येतोय. जेव्हा समजावून, विनंती करुनही शिक्षिका त्याची चूक पदरात घ्यावयास तयार नाही तेव्हा त्या मुलाने असे काय केले की, त्याच्या कृत्याने सर्वांचीच मने जिंकली. त्या लहान मुलाचा आणि शिक्षिकेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
नेमकं लहान मुलाने केले तरी काय?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका वर्गात शिक्षेकेसमोर लहान मुलगा उभा आहे. तर अनेकवेळा सांगूनही तु ऐकत नाही असे त्या शिक्षिकेचे म्हणणे आहे, तर मुलगा सातत्याने आता परत चूक करीत नाही अशी विनवणी अनेक वेळा करीत आहे. खूप वेळा मुलगा आणि शिक्षिकेमध्ये हा संवाद सुरु राहिलेला आहे. अनेक वेळा विनंती करुनही शिक्षिका ऐकत नसल्याने अखरे त्या लहानग्या मुलाने अचानक शिक्षकाच्या गालावर किस केले.
…आणि मग मुलानेही वचन दिले
अनेक वेळा शिक्षक हे मुलाला समजावून सांगताना आपण पाहिले आहे. पण या व्हिडिओमध्ये एक मुलगा आपली झालेली चूक पुन्हा होणार नाही हे अनेकवेळा समजावून सांगत आहे. मात्र, यापूर्वी अनेकवेळा सांगूनही तु ऐकत नाहीस असेच त्या शिक्षिकचे म्हणणे असल्याचे दिसत आहे. अखेर लहान मुलाने किस केल्यानंतर सर्व वर्गात हशा पिकतो. मग शिक्षक हसत हसत मुलाला सांगतो की, तू पुन्हा सैतानी करणार नाहीस, असे वचन देतोस. त्यामुळे मूलही शिक्षकाला वचन देते.