Aadhaar Card : आधार कार्डसाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन, तुम्हाला माहितीय? जाणून घ्या

| Updated on: Nov 28, 2024 | 11:41 PM

Aadhar Card : अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड द्यावं लागतं. आधार कार्डशिवाय कुठलंच काम होत नाही. मात्र आधार कार्डसाठी सर्वात सुरक्षित पर्याय तुम्हाला माहित आहे का?

Aadhaar Card : आधार कार्डसाठी हा सर्वात बेस्ट ऑप्शन, तुम्हाला माहितीय? जाणून घ्या
aadhar card
Follow us on

आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं दस्तऐवज आहे. जन्मानंतर ते मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड बंधनकारक आहे.  रेल्वे तिकीटसाठीही दस्तऐवज म्हणून आधार कार्ड बंधनकारक आहे. ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. सिम कार्ड घ्यायचा असेल, तरीही आधार कार्ड लागतं. एकूण आधार कार्ड किती महत्त्वाचं आहे, हे वेगळं सागंण्याची गरज नाही.

अनेकदा प्रवासादरम्यान बाहेर हॉटेलमध्ये थांबाव लागतं. अशावेळेस हॉटेल रिसेप्शनवर आधार कार्डची मागणी केली जाते. मात्र हॉटेल आणि इतर ठिकाणी आधार कार्ड देणं हे धोकादायक ठरु शकतं. आधार कार्डमध्ये वैयत्तिक माहिती असते. आधार कार्डवरील माहितीद्वारे कुणीही बँक संदर्भातील गोपनिय माहिती मिळवू शकतो. इतकंच काय, तर कुणीही आपल्या आधार कार्डचा गैरफायदा घेऊ शकतो.

तुम्ही जर हॉटेल आणि अन्य ठिकाणी आधार कार्ड देत असाल तर सर्वात मोठी चूक करताय. ओळखपत्र म्हणून आधार कार्डची झेरॉक्स देण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ओरिजनल आधार कार्डसाठी मोठा पर्याय उपलब्ध करुन दिलाय, ज्याबाबत सर्वसामांन्यांना फार माहित नाही. हॉटेल आणि यासारख्या अन्य ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स देण्याऐवजी मास्क आधार कार्ड देऊ शकता.

मास्क आधार कार्ड म्हणजे काय?

आधार कार्डवर आपलं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि आधार क्रमांक असतो. आधार क्रमांक हा 12 अंकी असतो. मात्र मास्क आधारवर 12 पैकी 8 अंक हे लपवलेले असतात. ज्यामुळे आर्थि फसवणुकीचा संभाव्य धोका टळतो. त्यामुळे अनोळखी ठिकाणी मास्क आधार हा सर्वोत्तम पर्याय आहे.

मास्क आधार डाऊनलोड कसं करायचं?

  • मास्क आधार डाऊनलोड करण्यासाठी Uidai च्या https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट ओपन केल्यावर ‘My Aadhar’ या टॅबवर क्लिक करा.
  • त्यांनतर मागितलेली माहिती भरा. त्यानंतर कॅप्चा टाकल्यानंतर आधारसह लिंक असलेल्या मोबाईलवर नंबरवर ओटीपी येईल.
  • ओटीपी टाकल्यानंतर पुढील पडताळणी (Verification) करावी लागेल.
  • व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ‘Download’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मास्क आधार पाहिजे का? तिथे क्लिक करा.
  • अशाप्रकारे मास्क आधार कार्ड डाऊनलोड झालेलं आहे. हे मास्क आधार कार्ड तुम्ही अनेक ठिकाणी वापरु शकता.