Transgenders Ayushman Bharat | देशातील लाखो तृतीयपंथींना (Transgenders)केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली. त्यांच्या आरोग्यासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. आयुष्यमान भारत योजनेतंर्गत (Ayushman Bharat Scheme) आता देशभरातील नोंदणीकृत तृतीयपंथींना आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. तृतीयपंथींना समाजात सन्मानाची आणि माणसूकीची वागणूक देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच असे पाऊल टाकण्यात येत आहे. बुधवारी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण(NHA) आणि सामाजिक न्याय मंत्रालयात (Social Justice Ministry) याविषयी करार करण्यात आला. परिणामी देशातील 4.80 लाख तृतीयपंथींना आता आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत. या योजनेतून 5 लाखांपर्यंतचा आरोग्य विमाही (PMJAY) त्यांना प्राप्त होणार आहे. योजनेतून 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवचही देण्यात येणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी या योजनेची माहिती दिली. आरोग्य मंत्रालयामार्फत नोंदणीकृत आणि प्रमाणपत्र प्राप्त तृतीयपंथींना पहिल्यांदाच अशा आरोग्य सुविधा आणि त्यासंबंधीचे लाभ देण्यात येत असल्याची माहिती दिली. केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार (Virendra Kumar) यांनीही या योजनेची कल्पना उचलून धरली. देशात पहिल्यांदाच असा प्रयोग राबवण्यात येत आहे. यातून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न असून त्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
या योजनेतंर्गत तृतीयपंथींना आयुष्यमान भारत योजनेतंर्गत प्रधानमंत्री जन सुरक्षा योजनेतून 5 लाख रुपयांच्या आरोग्य विम्याचे कवचही देण्यात येणार आहे. करारानुसार, आरोग्य विम्याचा खर्च हा सामाजिक न्याय विभाग करणार आहे. खर्चाचा भारआरोग्य मंत्रालयावर पडणार नाही. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार आणि आरोग्य मंत्री मनसूख मंडाविया यांनी संयुक्तरित्या या करारावर स्वाक्षऱी केली आहे. यावेळी दोन्ही खात्यांचे सचिव, उच्च अधिकारी ही उपस्थित होते. या योजनेमुळे हेटाळणीचे जीवन कंठत असणाऱ्या तृतीयपंथींना मोठा दिलासा मिळणार आहे.
देशात सरकारी विभागाकडे नोंदणी असलेले 4.80 लाख तृतीयपंथी आहेत. सामाजिक न्याय विभागाकडे त्यांनी नोंदणी केली आहे आणि त्यासंबंधीचे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे. या सर्व नोंदणीकृत 4.80 लाख तृतीयपंथींना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. आरोग्य मंत्र्यांनी देशभरातील नोंदणीकृत तृतीयपंथींची यादी आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट केल्याचा दावा केला आहे.
सरकारने नोंदणीकृत 4.80 लाख तृतीयपंथींना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला असतानाच आता दिल्ली आणि पश्चिम बंगाल या विरोधी सत्तेत असणाऱ्या राज्यांसाठीही विशेष तरतूद केली आहे. त्यांच्यासाठी या योजनेत बदल करण्यात आला असून त्यासंबंधीची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.