आधार कार्ड (Aadhaar Card) हे आता केवळ प्रौढ व्यक्तींसाठीच नव्हे तर लहान मुलांसाठी देखील महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. शाळेत प्रवेश घ्यायचा असो किंवा एखाद्या सरकारी योजनेला लाभ प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची गरज लागते. जर तुमच्या मुलांकडे आधार (Baal Aadhaar) नसेल तर त्याचे अनेक कामे अपूर्ण राहू शकतात. आधारचा उपयोग लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आता नवजात शिशुचे देखील आधार कार्ड तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचाच अर्थ आता तुम्ही तुमच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे देखील आधार कार्ड काढू शकता, त्यासाठी तुम्हाला 18 वर्ष वाट पाहाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्याचे आजही आधार कार्ड तयार करू शकता. मुलांच्या आधार कार्डसाठी ओळखीचा पुरावा म्हणून त्याचा जन्माचा दाखला किंवा जे मुले शाळेत जातात त्यांच्या शाळेचे आयडी कार्ड ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती युआयडीएआयच्या वतीने देण्यात आली आहे.
तुमचे वय जर अठरा वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुमच्याकडे ओळखीचा पुरावा सादर करण्यासाठी अनेक कागदपत्रे असतात. जसे की मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, बँकेचे पासबूक इत्यादी. मात्र ज्या मुलांचे वय हे अठरा वर्षांपेक्षा कमी असते, अशा मुलांकडे ओळखीचा एकमेव पुरावा असतो, तो म्हणजे त्यांचे आधार कार्ड त्यामुळे मुलांचे आधार कार्ड तयार करणे महत्त्ववाचे ठरते. तुम्ही तुमचा मुलगा किंवा मुलगी अगदी एक वर्षाची जरी असली तरी देखील तुम्ही तिचे आधार कार्ड बनवू शकता. संबंधित व्यक्ती आठरा वर्षांची झाल्यानंतर पुन्हा एकदा आधार अपडेट करणे गरजेचे असते.
कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड तयार करायचे असल्यास ओळखीचा पुरावा महत्त्वाचा असतो. लहान मुलांकडे ओळखीच्या पुराव्याची असलेली अडचन लक्षात घेऊन आता युआयडीएआयने शाळेच्या आयकार्डला देखील मान्यता दिली आहे. जर तुमच्यामुलाकडे शाळेचे आयकार्ड असेल तर तुम्ही त्याच्याआधारे आधार कार्ड तयार करू शकता. मात्र त्यासाठी एकच अट आहे, ती म्हणजे हे आयकार्ड अधिकृत आणि मान्यता प्राप्त शाळेचे असावे. तुम्ही आधारसाठी ओळखीचा पुरावा म्हणून आय कार्ड देखील सादर करू शकता.
You can use your child’s school ID (Photo ID issued by Recognized Educational Institution) for his/ her #Aadhaar enrolment. To save time, book an appointment from https://t.co/QFcNEqehlP #KidsAadhaar #BaalAadhaar #Identity #Appointment pic.twitter.com/cQ5TR3UZNe
— Aadhaar (@UIDAI) March 16, 2022
Credit score म्हणजे काय रे भाऊ? खराब क्रेडिट स्कोरचे तोटे समजून घ्या
Home loan डिफॉल्ट झालंय? चिंता करू नका, ‘असे’ फेडा आपल्या घराचे हप्ते