नवी दिल्ली | 9 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिना हा कर्मचाऱ्यांसाठी सुगीचा ठरणार आहे. भारतीय सणातील सर्वात मोठा दिवाळी सण आता तोंडावर आला आहे. या काळात देशातील अनेक शहरात बँका बंद असतील. राज्यात पण या दिवशी बँका बंद असतील. या महिन्यात शनिवार-रविवारसह सणाच्या दिवशी बँक बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्या जाहीर केल्या आहेत. त्यात काही सुट्ट्या प्रदेशानुसार बदलतात. त्या भागात सुट्टी असली तरी महाराष्ट्रात त्यादिवशी बँका सुरु असतील. आता डिजिटल युग असल्याने पैशांचे अनेक व्यवहार मोबाईलवरुनच होतात.
या दिवशी बँका बंद
येत्या रविवारपासून दिवाळी सुरु होत आहे. 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीनिमित्त बँकेला सुट्टी असेल. हा सण पाच दिवसांचा आहे. धनत्रयोदशी आणि भाऊबीजला 15 तसेच इतर दिवशी पण सुट्टी असेल. यामध्ये 12, 13 आणि 14 अशा सलग तीन दिवस सुट्या असतील. 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी देशातील अनेक शहरातील बँका बंद असतील.
या दिवशी सुट्टी
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.