नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : आपले अनेक आर्थिक व्यवहार बँकेशी संबंधित असतात. आता डिजिटल आणि ऑनलाईन जगतात बँकेत जाण्याचे काम कमी झाले असले तरी बँकेत जावेच लागते. व्यवहार ऑनलाईन झाले असले तरी कर्ज प्रकरण अथवा इतर अनेक कामे बँकेत जाऊनत करावी लागतात. आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. सप्टेंबर महिन्यात गुलाबी नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी बँकेत जावे लागेल. त्यामुळे सुट्टी कधी आहे, हे पाहूनच बँकेत गेल्यास नाहकची चक्कर टळेल. सुट्यांचा अंदाज घेत, लवकरात लवकर काम पूर्ण करा. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी वार्षिक सुट्यांची यादी (Bank Holidays in September 2023) जाहीर केली आहे. सप्टेंबर महिन्यात सुट्यांची दखल घेत काम उरकून घ्या.
सुट्याच सुट्याच
सप्टेंबर महिन्यात एकूण 16 दिवस बँकांना टाळे राहील. यामध्ये राष्ट्रीय आणि राज्यातील सुट्यांचा समावेश आहे. अर्थात राज्यानुसार, या सुट्यांमध्ये फरक असतो. एखाद्या राज्यात असली तरी दुसऱ्या राज्यात त्या दिवशी बँकेचे कामकाज सुरु असते. श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद-उल-नबी या दिवशी काही राज्यांमध्ये बँकांचे कामकाज होणार नाही. त्यामुळे बँकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.
या दिवशी राहतील बँका बंद
ऑनलाईन बँकिंगचा फायदा
ऑनलाइन बँकिंग सेवेमुळे ऑनलाईन रक्कम हस्तांतरीत करता येईल. पण त्यासाठी बँकेचे नियम आहेत. त्यानुसार, मर्यादीत रक्कम हस्तांतरीत करता येईल. सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.