Gold in Mobile Phones : जगभरात ‘सोन्या’ चे भाव (Gold prices) सातत्याने गगनाला भिडत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का.. मोबाईल वापरणारा सामान्य माणूसही सोने सोबत ठेवतो. तुम्हाला खरे वाटत नसले तर हे सत्य आहे. प्रत्येक मोबाईल फोन आणि टॅबलेटमध्ये काही प्रमाणात सोने सापडते. वास्तविक, मोबाईल आणि ‘टॅबलेट’ बनवण्यासाठी सोन्याचा वापर केला जातो. हे जाणून घेतल्यास, आपल्या स्मार्टफोनमधून (smartphone) सोने काढण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. UN च्या अहवालानुसार 1 ग्रॅम सोने काढण्यासाठी 41 मोबाईल फोन लागतात. म्हणूनच सोन्याचा वापर इलेक्ट्रॉनिक उपकरण जसे की संगणक, मोबाईल, टॅब्लेट इत्यादींमध्ये होतो. आपल्या मोबाईलमध्ये काही सर्किट असतात. हे सर्किट बनवण्यासाठी (To make a circuit) सोन्यासह अनेक धातूंचा वापर केला जातो.
सर्किट बनवण्यासाठी होतो वापर
एका मोबाइलमध्ये सुमारे 60 घटक असतात. यामध्ये सोन्याव्यतिरिक्त तांबे आणि चांदी देखील आढळतात. सर्किट बनवण्यासाठी सोने, तांबे आणि चांदीचा वापर केला जातो कारण हे तीन धातू विजेचे चांगले वाहक मानले जातात. सोन्याचा एक फायदा म्हणजे ते लवकर खराब होत नाही. जुना मोबाइल फेकून दिल्याने सोनेही हातातून निघून जाईल, असा विचार तुम्ही करत असाल तर, अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, मोबाईलमधून सोने काढण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे.
व्यावसायिकच काढू शकतात मोबाईलचे सोने
मोबाईलमध्ये सोन्याचे प्रमाण खूपच कमी असते. मोठ्या प्रमाणात सोने काढण्यासाठी अनेक स्मार्टफोन्सची आवश्यकता असेल. पण हे तितके सोपे नाही कारण मोबाईल फोनमधून सोने काढण्याचे काम फक्त व्यावसायिकच करू शकतात. मोबाईलमधील सोने काढणे इतके अवघड का आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. वास्तविक, सोने काढण्यासाठी काही विशेष रसायने वापरली जातात. ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि लांबलचक आहे. अनेक टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर सोने बाहेर येते. केवळ काही व्यावसायिकांनाच याबद्दल संपूर्ण माहिती आहे. मोबाईलमधून सोने बाहेर काढण्याचे काम हे व्यावसायिक करतात. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सध्या सोन्याची किंमत जाणून घ्यायची असेल, तर ती सुमारे 50-100 रुपये असेल.