Rules Changes : शेअर बाजारापासून ते सोने खरेदीपर्यंत असा होईल बदल, 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर पडेल भार

| Updated on: Mar 28, 2023 | 8:52 PM

Rules Changes : येत्या 1 एप्रिलपासून अनेक नियमात बदल होत आहे. त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या तुमच्यावर मोठा परिणाम होणार आहे. तुमला या बदलत्या नियमांची झळ बसण्याची शक्यता आहे.

Rules Changes : शेअर बाजारापासून ते सोने खरेदीपर्यंत असा होईल बदल, 1 एप्रिलपासून तुमच्या खिशावर पडेल भार
Follow us on

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2023 पासून नियमात मोठा बदल (Rules Changes) होईल. यामध्ये अनेक आर्थिक आणि गुंतवणुकीसंदर्भातील बदलांचा समावेश आहे. यातील काही कामे तर 31 मार्चपर्यंत पूर्ण करायची आहे. कारण नवीन आर्थिक वर्षात या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या कालावधीत तुमचे काही महत्वाचे काम अडकले असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या. या नवीन बदलात आता आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणीला (Aadhaar- Pan Card Linking) मुदतवाढ देण्यात आल्याने जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच आधार कार्ड-मतदान ओळखपत्र कार्ड जोडणीलाही मुदतवाढ देण्यात आली आहे.

दिव्यांगासाठी विशिष्ट ओळखपत्र

दिव्यांगासाठी 17 सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. पण त्यासाठी 1 एप्रिलपासून ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. दिव्यांगांना आता हे विशिष्ट ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे हे ओळखपत्र नाही, त्यांनी आधार कार्डचा क्रमांक द्यावा लागेल. तुम्हाला हे ओळखपत्र काढण्यासाठी www.swavlambancard.gov.in या ठिकाणी जाऊन दिव्यांग ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागेल .

हे सुद्धा वाचा

नवीन कर व्यवस्था लागू

केंद्र सरकार नवीन कर व्यवस्था (New Tax Regime) 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन कर व्यवस्थेत केंद्र सरकारने करदात्यांना दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प 2023 मध्ये 7 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांनी जुनी कर व्यवस्था निवडली तर त्यांना या सवलतीवर पाणी सोडावे लागेल. 1 एप्रिलपासून हा नियम लागू होईल.

इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल

नवीन कर व्यवस्थातंर्गत कर रचनेत 0 ते 3 लाख रुपयांवर शून्य, 3 ते 6 लाखांवर 5 टक्के, 6 ते 9 लाख रुपयांवर 10 टक्के, 9 ते12 लाखांवर 15 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के सवलत मिळेल. एलटीए मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी नसणाऱ्यांना लिव्ह इनकॅशमेंट 2002 नुसार, 3 लाख रुपये होती. त्यात आता भरघोस वाढ करुन 25 लाख करण्यात आली आहे.

हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री नाही

ग्राहक मंत्रालयाने शुक्रवारी सोने आणि दागिन्यांच्या खरेदी विक्रीसाठी नियमात बदल केला आहे. 1 एप्रिलपासून हॉलमार्क क्रमांकाशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. नवीन नियमानुसार, 31 मार्च, 2023 नंतर चार अंकी हॉलमार्क युनिक ऑयडेंटिफिकेशन (HUID) आभुषणे आणि दागिने खरेदी-विक्री करता येणार नाही. 1 एप्रिलपासून सहा आकडी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग दागिनेच मान्य राहतील.

जीवन विमा पॉलिसी

5 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमपेक्षा अधिक जीवन विमा हप्त्यातून होणारे उत्पन्न आता करपात्र असेल. नवीन आर्थिक वर्षात, म्हणजेच 1 एप्रिल 2023 रोजीपासून हे उत्पन्न करपात्र ठरेल. त्यावर गुंतवणूकदारांना कर द्यावा लागेल .

कार होतील महागड्या

1 एप्रिल 2023 रोजीपासून कार तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या उत्पादनात वाढ करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या काही दिवसात कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या तीन दिवसांत तुम्हाला वाहन खरेदी करता येईल. 1 एप्रिल पासून या कारमध्ये 0BD-2 हे यंत्र बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ होणार आहे.

डेट फंडवर कर सवलत नाही

सध्याच्या काळात डेट फंडमध्ये गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिटचा कर फायदा मिळतो. जर कोणी डेट फंडमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवल्यास, इंडेक्सेशन बेनिफिटसह 20% लॉन्ग टर्म कॅपिटल गेन कर लावल्या जातो. वास्ताविक, फिक्स्ड डिपॉझिटवर मिळत असलेले व्याज टॅक्स स्लॅबनुसार मिळते. प्रस्तावानुसार, तीन वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत डेट फंडाच्या इंडेक्सेशनचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही 20% टॅक्स बेनिफिटसाठी पात्र नसाल.