मुंबई, बऱ्याचदा ग्रुपने प्रवास करताना एकत्रच तिकीट काढण्यात येते. अशा वेळी एकाच पीएनआरवर (One PNR) एकापेक्षा जास्त जणांची रेल्वेची तिकीट काढण्यात येते. यामध्ये प्रत्येक प्रवाशाला वेगळे तिकीट लागत नाही. पण जर एखाद्याचा प्लॅन बदलला आणि त्याने ट्रिप रद्द केली तर? अशा परिस्थितीत त्याचे तिकीट रद्द (Cancel Railway Ticket) करावे लागेल, अन्यथा प्रवास न करता त्याचे पैसे कापले जातील. एकाच पीएनआरवर अनेक लोकांची तिकिटे असल्याने ज्या प्रवाशाला प्रवास करायचा नाही तो काय करणार? यासाठीच नियम थोडा वेगळा आहे हे. जाणून घेऊया याची प्रक्रिया (Online Process).
तिकिटांचे बुकिंग रेल्वे काउंटरवरून होत असेल, तर कॅन्सलही काउंटरवरच करावे लागेल. जर तिकीट बुकिंग आयआरसीटीसीच्या ई-तिकीटिंग वेबसाइटवरून केले असेल, तर तिकीट ऑनलाइन सहजपणे रद्द केले जाऊ शकते. जर तुम्हाला अनेक तिकिटांपैकी एखादे तिकिट रद्द करायचे असेल तर त्याला आंशिक रद्द करणे म्हणतात. यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. आयआरसीटीसी चार्ट तयार होईपर्यंत कन्फर्म तिकीट रद्द करण्याची सुविधा देते. तिकीट बुकिंग ऑनलाइन झाल्यामुळे हे काम तुम्हाला ऑनलाइन करावे लागेल हे लक्षात ठेवा.