२२ हजार किलोमीटरची साहसी मोहिम, कधी उष्ण ते कधी अतिशय थंड वातावरणातून जातील CEAT चे टायर्स

| Updated on: Aug 04, 2023 | 8:50 PM

प्रत्येक वेगवेगळ्या विषम हवामानाचा सामना करत त्यांना हा प्रवास करावा लागणार आहे, कठीण भूप्रदेशात वाहन चालविण्याचा त्यांना अनुभव आहे.CEAT टायर्सने सुसज्ज भारतीय वाहने पृथ्वीवरील सर्वात थंड राहण्याचे ठिकाणी, ‘पोल ऑफ कोल्ड’मध्ये प्रवेश करणार आहेत.

२२ हजार किलोमीटरची साहसी मोहिम, कधी उष्ण ते कधी अतिशय थंड वातावरणातून जातील CEAT चे टायर्स
CEAT TAYERS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : सीएट टायर या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने एक साहसी मोहिम आयोजित केली आहे. या अभूतपूर्व मोहिमेला आरपीजी हाऊस, मुंबई येथे CEAT लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्णब बॅनर्जी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. या वाहनांची मुंबई पासून मोहिम सुरु झाली आहे. ही मोहीम भारतातून, नेपाळ, तिबेट, चीन, दक्षिण सायबेरिया, मंगोलियातून याकुत्स्ककडे जाईल. नंतर हा प्रवास त्यांना भयावह रोड ऑफ बोन्समधून घेऊन मगादानकडे जाईल आणि नंतर वळसा घालून ओम्याकोनला जाईल. या ठिकाणाला पोल ऑफ कोल्ड असं म्हटलं जातं. कारण, पृथ्वीवरील सर्वात थंड वस्तीचे ठिकाण अशी याची ओळख आहे. सर्वात शेवटी व्लादिवोस्तोकहून ही वाहनं भारतात परततील.

खरं तर अतिशय थरारक मोहीम फक्त मानवाची सहनशक्ती तसेच अभियांत्रिकी कौशल्याची परीक्षाच नाही, तर अत्यंत कठीण भौगोलिक प्रदेशात, हवामानाचा सामना करत जिंकण्याची भारताची क्षमता आहे. भारतीय टीम CEAT टायर्ससह भारतीय बनावटीची वाहने चालवत आहेत, हे स्पष्ट आहे. जागतिक स्तरावर एक शिक्कामोर्तब होणार आहे. एवढंच नाही जागतिक स्तरावर भारतीय नावलौकिकात निश्चितच मोठी वाढ होणार आहे. या दहा आठवड्यांच्या प्रवासाचे लाईव्ह अपडेट CEAT च्या सोशल मीडिया पेजेसवर #CEATWBBExpedition बघता येतील.

भारतातील अग्रगण्य टायर उत्पादक CEAT लिमिटेडला दूरवरील जमिनीवरील मोहिमेतील अग्रणी वॉन्डर बियॉन्ड बाउंडरीज (WBB) साठी शीर्षक प्रायोजकत्वाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. ते ५ देश आणि ६ टाईम झोनमधून प्रवास करत भारतातील मुंबई येथून मगदान पर्यंत ऐतिहासिक २२,००० किमी अशा जमिनीवरच्या प्रवासाला निघाले आहेत.

WBB च्या संस्थापक निधी सालगामे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम निघाली आहे. प्रत्येक वेगवेगळ्या विषम हवामानाचा सामना करत त्यांना हा प्रवास करावा लागणार आहे, कठीण भूप्रदेशात वाहन चालविण्याचा त्यांना अनुभव आहे. CEAT टायर्सने सुसज्ज भारतीय वाहने पृथ्वीवरील सर्वात थंड राहण्याचे ठिकाणे ‘पोल ऑफ कोल्ड’मध्ये प्रवेश करणार आहेत. हा विलक्षण प्रवास CEAT टायर्सच्या अत्यंत आव्हानात्मक भूप्रदेशातील कामगिरीची आणि उल्लेखनीय स्तरावर संघाची आत्मविश्वास, परीक्षा, सहनशीलता याची परीक्षा होणार आहे. ही मोहिम भारताच्या सहनशक्तीची, धैर्याची एक नवी छाप सोडणारी आहे.

CEAT लिमिटेडचे मुख्य विपणन अधिकारी लक्ष्मी नारायणन बी यावेळी म्हणतात, “CEAT देशाच्या सीमा ओलांडण्यात विश्वास करणारी संस्था आहे , सीमा तोडून ही मोहीम आम्हाला केवळ वॉन्डर बियॉन्ड बाऊंडरीजच्या या ऐतिहासिक प्रयत्नाला पाठिंबा देण्याचीच नाही, तर टीम म्हणून CEAT टायर्सची कामगिरी दाखवण्याची एक अनोखी पर्वणी आहे. भारत ते सायबेरिया असा २२ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करताना आव्हानात्मक भू प्रांताना सामोरे जावे लागेल. हा उल्लेखनीय प्रवास म्हणजे आमच्या ब्रँडच्या नाविन्यपूर्णता, लवचिकता आणि नवनवीन गोष्टींचा मागोवा घेण्याप्रती असलेल्या बांधिलकीचे उदाहरण आहे. यामुळे आम्हाला आरपीजी हाऊसमधून या कार्यक्रमाची सुरुवात करताना अतिशय अभिमान वाटतोय. टीम या ७५ दिवसांच्या साहसी मोहिमेला सुरुवात करतेय. CEAT च्या दुर्दम्य भावनेला एक रुप देणार आहे. मोठ्या अपेक्षेने, मी निधी सालगामे आणि त्यांच्या टीमला अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देत आहोत. कल्पनेच्या बाहेर असलेल्या या प्रदेशांमधून आपला मार्ग कोरत धैर्य, साहस आणि दृढनिश्चयाचा वारसा ते मागे ठेवत आहेत.”

वॉन्डर बियॉन्ड बाउंडरीजच्या संस्थापक आणि मोहीम लीडर निधी सालगामे म्हणाल्या, “CEAT सोबत आमचा ऋणानुबंध लडाख आणि नागालँड ऑफरोडमधील झंस्कर आणि त्या पलीकडील WBB मोहिमेपर्यंत जुना आहे. डर्ट ट्रॅक, खडकाळ, खडी, पाण्याचे प्रवाह अशा विविधांगी भूप्रदेशातून CEAT ऑल टेरेन टायर्सनी खूप चांगली, चमकदार कामगिरी केली आहे. रोड टू सायबेरिया या मोहिमेवर जाणे खरोखरच सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. ही मोहीम माझ्यासाठी अतिशय महत्वाची, ऐतिहासिक आणि दुप्पट रोमांच उभी करणारी आहे.

विशेषत: यावेळी, आम्ही सगळेजण भारतीय आहोत. भारतीय टायर्सवर भारतीय वाहनातून प्रवास करणार आहोत! माणसासाठी जसे पाय महत्वाचे तसेच टायर्स म्हणजे वाहनांचे पाय! त्यांच्यामुळेच प्रवास शक्य होतो. मला विश्वास आहे की CEAT क्रॉसड्राइव्ह ऑल-टेरेन टायर्स नेपाळ आणि तिबेटच्या पर्वतीय भागांवर पोहोचल्यावर त्यांची क्षमता सिद्ध करतील. मगदान येथे आम्ही विशेष हिवाळी टायर्स बदलू कारण आम्हाला सायबेरियात बर्फ आणि बर्फाने आच्छादलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागेल. WBB वर विश्वास ठेवल्याबद्दल आणि या ऐतिहासिक मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही CEAT चे ऋणी आहोत.”

CEAT टायर्सने ऑटोमोटिव्ह उद्योगात अतुलनीय कामगिरी आणि विश्वासार्हतेसाठी एक मजबूत नावलौकिक मिळविला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि विविध रस्त्यांच्या परिस्थितीची सखोल माहिती यांचा उपयोग करून CEAT टायर्स जगभरातील ड्रायव्हर्सना सातत्याने लाभ मिळवून देत आहेत. आव्हानात्मक भूप्रदेशात दिशादर्शन करणे, विविध हवामान परिस्थितीत टिकून राहणे किंवा उत्कृष्ट ट्रॅक्शन आणि नियंत्रण पुरविणे असो, CEAT टायर्सनी या सर्व विभागात अतुलनीय कामगिरी दर्शवली आहे. टिकाऊपणा आणि सुरक्षिततेसाठी काटेकोरपणे चाचणी केली गेली आहे. ते एक सुलभ आणि आरामदायी राइड देतात, प्रत्येक प्रवासात ड्रायव्हर्सना अत्यंत आत्मविश्वासाने प्रेरित करतात. ड्रायव्हर्सना ते विसंबून राहू शकतील असा अखंड आणि समाधानकारक ड्रायव्हिंग अनुभव देत नावीन्यपूर्णतेचा वारसा आणि गुणवत्तेशी असलेली दृढ बांधिलकी यांसह CEAT टायर्स ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कामगिरी निश्चितच उंचावत आहेत.

डॉक्टर, इंटीरियर डेकोरेटर आणि सेंद्रिय शेतकरी अशा विविध पार्श्वभूमीतील उत्साही ड्रायव्हिंग प्रेमी लोकांसह बंगळुरू, हुबळी, हैदराबाद आणि पुणे येथील ८ व्यावसायिकांच्या वैविध्यपूर्ण टीमला रस्ते आणि नवनवीन शोधकल्पना याविषयी प्रेम आहे. हा प्रवास केवळ भौगोलिक सीमा ओलांडण्याचा नसून स्वत:चा शोध घेणे आणि जीवनाला स्वत:च्या दृष्टीकोनातून आकार देणे यासाठीचा आहे.

ही महत्त्वाची, थरारक मोहीम केवळ मानवी सहनशक्ती आणि अभियांत्रिकी कौशल्याची परीक्षाच नाही तर अत्यंत कठीण भूभाग आणि हवामान यांना तोंड देत जिंकण्याची भारताची क्षमता दाखवून देणारी पावतीही आहे. भारतीय टीम CEAT टायर्ससह भारतीय बनावटीची वाहने चालवत असून निःसंशयपणे जागतिक स्तरावर एक अमिट छाप सोडेल आणि जागतिक स्तरावर भारताच्या नावलौकिकात आणखी वाढ होईल.