Marathi News Utility news Central employees to receive big gifts in July The possibility of a re increase in DA Inflation allowance may increase due to 'these' reasons
जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट; डीएमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता; ‘या’ कारणांमुळे वाढू शकतो महागाई भत्ता
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकार डीएमध्ये तीन टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेंशनधारकांना होणार आहे.
1 / 5
केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना (Central Govt Employees) सरकारच्या वतीने लवकरच मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकार जुलैमध्ये पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढवण्याची शक्यता आहे. यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत आहे. याचा फायदा देशातील कोट्यावधी नागरिकांना होऊ शकतो.
2 / 5
मिळत असलेल्या माहितीनुसार महागाईचा इंडेक्स 'एआयसीपीआय' वाढल्याने हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 'एआयसीपीआय' इंडेक्समध्ये घसरण झाली होती. जानेवारीमध्ये इंडेक्स 125.1 टक्के इतका होता. तर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्यामध्ये आणिख घसरण होऊन तो 125 झाला. मात्र मार्च महिन्यात या इंडेक्समध्ये अचानक एका टक्क्याची वाढ होऊन तो 126 वर पोहोचला. वाढत्या महागाईचा लाखो लोकांना फटका बसत आहे. यामुळे आता केंद्र सरकार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
3 / 5
सातव्या वेतन आयोगानुसार वर्षातून दोनदा डीएमध्ये वाढ केली जाते. वर्षाच्या सुरुवातील जानेवारीमध्ये तर दुसऱ्यांदा जुलैमध्ये, कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये महागाईच्या आधारे वाढ होते. यंदा डीए तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
4 / 5
दरम्यान केंद्र सरकारने या वर्षी एकदा महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ केली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेंशनधारकांना 34 टक्क्यांच्या दराने डीए देण्यात येत आहे. जुलैमध्ये डीएमध्ये आणखी तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. डीए वाढल्याचा फायदा एकूण 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेंशनधारकांना होणार आहे.
5 / 5
कोरोना काळात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीला ब्रेक लावण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गेल्या वर्षी जुलै महिन्यात डीएमध्ये अकरा टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. डीए सतरा टक्क्यांहून 28 टक्क्यांवर पोहोचला त्यानंतर सातत्याने डीएमध्ये वाढ करण्यात येत आहे.