नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) किंमती अद्यापही सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर आहेत. पण त्यावरील कर्जाचे व्याजदर मात्र कमी आहे. कर्ज स्वस्त असल्याने तुम्हाला इलेक्ट्रिक कार कार अथवा बाईक खरेदी करता येऊ शकते. पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) कारसाठी, दुचाकीसाठी कर्जाचा दर तुम्हाला लागू होत नाही. उलट त्यापेक्षा कर्ज स्वस्त मिळते.
इलेक्ट्रिक व्हेईकल या पर्यावरण पूरक म्हणून लोकप्रिय होत आहे. दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी कळस गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. अशावेळी ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक व्हेईकलकडे वाढला आहे. काही दिवसातच या बाईक्सची किंमत कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
अपारंपारिक ऊर्जा आणि ऊर्जेचा पूनर्वापर याचा इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी वापर करण्यात येतो. या वाहनांमुळे वातावरण प्रदूषित होत नाही. याची मेंटेनेंस कॉस्टही कमी आहे. तसेच खरेदीतही सुविधा मिळते. इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी केंद्र सरकारने करातही सवलत दिली आहे.
काही वर्षात देशातील विविध भागात चार्जिंग स्टेशन सुरु होतील. त्यामुळे ईव्ही खरेदीसाठी हा अनुकूल काळ आहे. अनेक कंपन्या आता चारचाकी ही बाजारात आणत आहे. विशेष म्हणजे टाटा कंपनीने बजेट इलेक्ट्रिक कार आणण्याची घोषणा केल्याने अनेक कंपन्या बजेट कार आणण्याची तयारी करत आहेत.
विविध वित्तीय संस्था इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करण्यासाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करुन देत आहेत. त्यासाठी अनेक ऑफर्सही देत आहेत. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज घेताना सवलत ही देण्यात येते.
अॅक्सिस बँक ग्राहकांना सर्वात स्वस्त कर्ज देत आहे. बँक इलेक्ट्रिक व्हेईकलससाठी 7.70 टक्के व्याज आकारत आहे. तर पेट्रोल-डिझेलसाठी हा व्याजदर 8.20% आहे. स्टेट बँक 7.95 टक्क्याने कर्ज देते. बँक ऑफ बडोदाही याच दराने कर्ज पुरवठा करते. तर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडियन बँक, कॅनरा आणि कर्नाटक बँकांचा व्याजदर 8 टक्क्यांच्यावर आहे.