लिफ्टमध्ये अडकल्यावर या चुका करु नयेत, नेमके काय करावे पाहा

| Updated on: Aug 04, 2023 | 9:53 PM

लिफ्टमध्ये नागरिक अडकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पाहूयात लिफ्टमध्ये अडकल्यावर नेमक काय करावे हे पाहूयात.

लिफ्टमध्ये अडकल्यावर या चुका करु नयेत, नेमके काय करावे पाहा
elevator
Image Credit source: socialmedia
Follow us on

नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : उजबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये एका 32 वर्षीय महिला ओल्गा लियोन्टीवा हीचा लिफ्टमध्ये तीन दिवस अडकल्याने मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी कोणी आलेच नाही. त्यामुळे नैराश्याच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. अशाप्रसंगी आपल्या मानसिक क्षमतेची कसोटी लागते. त्यामुळे लिफ्टमध्ये अडकल्यावर नेमके काय करावे काय करु नये हे पहाणे महत्वाचे आहे.

उजबेकिस्तानच्या घटनेत वीजप्रवाह खंडीत झाल्याने 9 मजल्याच्या इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर ही लिफ्ट अडकली. त्यामुळे ही महिला एकटीत त्या लिफ्टमध्ये अडकून पडली. चौकशी असे समजले की लिफ्टमध्ये अनेक बिघाड असल्याने ही लिफ्ट अडकली. लिफ्टमध्ये नागरिक अडकण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पाहूयात लिफ्टमध्ये अडकल्यावर नेमक काय करावे हे पाहूयात.

प्रश्न – लिफ्टमध्ये अडकल्यावर घाबरायला का होते ? 

उत्तर – लिफ्ट चारीही बाजूंनी बंद असल्याने माणसांना क्लस्ट्रोफोबिया होतो. क्लस्ट्रोफोबिया असा मानसिक आजार आहे ज्यात अरुंद जागेत माणूस अडकल्यावर त्या प्रचंड घाबरायला होते. गळा सुकून प्रचंड तहान लागते. ब्लडप्रेशर वाढते. अंधारात जसे आपल्या घाबरायला होते. तसेच लिफ्टमध्ये एकटे अडकल्यावर होते. त्यामुळेच लिफ्टमध्ये आरसे लावलेले असतात.

प्रश्न – लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करायला हवे ?

उत्तर – लिफ्टमध्ये अडकल्यावर घाबरु नये. घाबरुन लागोपाठ एक साथ अनेक बटणे दाबू नये. अंधार झाला असेल तर मोबाईलची लाईट सुरु करावी. नेटवर्क चालत असेल तर जवळच्या व्यक्तीला लगेच फोन करुन कल्पना द्यावी. लिफ्टमध्ये अलार्मचे बटण असेल तर ते दाबावे. त्यामुळे तुम्हाला मदत मिळेल. जर लिफ्टमध्ये इंटरकॉम फोन असेल तर त्यावरुनही मदत मागावी.

लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करु नये ?

उत्तर – लिफ्टमध्ये अडकल्यावर स्वत: दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करु नये. यातून तुम्हाला दमायला होईल. तसेच तुम्ही जखमी देखील होऊ शकता. लिफ्टच्या दरवाजातून जर बाहेरचे दृश्य दिसत असेल तर हाक मारुन बाहेरच्या व्यक्तींना मदतीसाठी बोलवावे. लिफ्टमध्ये जादा लोकांनी चढून ओव्हरलोड कधी करु नये. लिफ्टचे दार नीट बंद होत नसेल तर त्यात शिरु नये कदाचित लिफ्ट खराब असू शकते. लहान मुलांना एकट्याने लिफ्टचा वापर करु देऊ नये. सोबत असताना लहान मुलांना लिफ्टची बटणे वारंवार दाबायला किंवा दरवाजा वारंवार बंद उघड करायला मनाई करावी. लिफ्टला हाताने किंवा पायाने बंद किंवा उघडण्याचा प्रयत्न करु नये. आग किंवा भूकंपाच्या स्थितीत लिफ्टचा वापर करु नये. सोसायटीला लिफ्टचे मेन्टेनन्स वेळोवेळी करायला सांगावे.