Why Only Write In Cheque : जास्तीत जास्त लोकांनी बँकेत खाते उघडावे म्हणून सरकारकडून महत्त्वाचे पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच देशातील बहुसंख्य लोकांची बँकेत खाती असल्याचं दिसून येत आहे. सरकार सबसिडीचे पैसे आणि जन कल्याण योजनांच्या पात्र लोकांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण ज्यांचे बँकेत खाते आहेत, ते लोक कधी ना कधी तरी चेकचा वापर करतात. तुम्हीही चेकचा वापर केला असेलच. चेकमध्ये शब्दांमध्ये रक्कम भरल्यानंतर त्यानंतर शेवटी ‘Only’ किंवा ‘फक्त’ असं लिहितो. पण तसं लिहिणं किती आवश्यक आहे हे माहित आहे का? जर तुम्ही ओन्ली नाही लिहिलं तर तुमचा चेक बाऊंस होऊ शकतो का?
खरंतर सेफ्टी म्हणून चेकवर ओन्ली असं लिहिलं जातं. चेकवर शब्दांमध्ये रक्कम लिहिल्यानंतर त्याच्या शेवटी ओन्ली लिहिल्याने सेक्युरिटी निर्माण होते. या शब्दामुळे फ्रॉड होण्याची शक्यता फारच कमी असते. चेकवर ओन्ली लिहिल्यानंतर त्यापुढे आकडा वाढवून कोणी मनमानीपणे रक्कम वाढवून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. ओन्ली लिहिलेलं नसेल तर त्यापुढे रकमेचा आकडा वाढवला जाण्याची शक्यता अधिक असते.
समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला चेकद्वारे 50,000 हजार रुपये देत असाल. आणि ही रक्कम तुम्ही वर्ड्समध्ये लिहिली. त्यानंतर तुम्ही ओन्ली हा शब्द लिहिला नाही. त्यामुळे तुम्ही जी रक्कम टाकली आहे, त्यानंतर संबंधित व्यक्ती आणखी काही शून्य वाढवण्याची शक्यता असते. कारण तुम्ही रकमेच्या नंतर ओन्ली हा शब्द लिहिलेला नसतो. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक होऊ नये, कोणतीही चालबाजी होऊ नये म्हणून रक्कमेचा आकडा लिहिल्यानंतर ओन्ली किंवा फक्त असं लिहिलं जातं. तसेच नंबर्समध्ये रकम लिहिल्यानंतर /- (50,000 /-) त्याच्या शेवटी असं चिन्ह टाकणंही आवश्यक असतं. याचा अर्थ रक्कम इथे संपली आहे, असा होता. त्यामुळे कोणीही तुमच्या नंबर्सच्या नंतर शून्य वाढवू शकणार नाही.
काही लोकांच्या मनात चेकबाबत असंख्य प्रश्न असतात. जर चेकवर शब्दात रक्कम लिहिल्यानंतर ओन्ली नाही लिहिलं किंवा नंबर्समध्ये रक्कम भरल्यावर /- हे चिन्ह नाही टाकलं तर चेक बाऊन्स होतो का? असा अनेकांना प्रश्न पडतो. तर त्याचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही ओन्ली नाही लिहिलं किंवा /- हे चिन्ह नाही टाकलं तरी चेक बाऊन्स होत नाही. बँकेतून रक्कम काढण्यास अडथळा येत नाही. फक्त तुमची फसवणूक होऊ नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने त्या गोष्टी केल्या जातात. त्याचा बँकेतून रक्कम काढण्याशी काही संबंध नाही.