ग्राहक युपीआयला त्यांच्या क्रेडिट कार्डसोबत (UPI linked to Credit Card) जोडू शकतात. आतापर्यंत डेबिटकार्डसोबतच युपीआय जोडल्या जात होते. खर्च केल्यावर आपोआप डेबिट कार्डमधून रक्कम कट होत होती. आता हीच सुविधा क्रेडिट कार्ड धारकांना (Card Holders) देण्यात आली आहे. बिल आता अदा करा आणि एका महिन्यानंतर रक्कम अदा करा अशी, क्रेडिट कार्डवर सोय मिळते. म्हणजेच तुम्हाला आता पैसे खर्च करण्याची गरज नाही. पुढील महिन्यांत तुम्हाला हा खर्च चुकता करावा लागणार आहे. ग्राहकाला 30 ते 55 दिवसांच्या आत रक्कम भरण्याची सुविधा मिळते. सुविधा मिळाली असली तरी त्यासोबत जबाबदारी पण आहे. वेळेच्या आत बिल अदा करण्याची आणि समजदारीने रक्कम खर्च करण्याची जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल. तरच तुम्ही कर्जाच्या आणि चक्रवाढ व्याजाच्या जंजाळात अडकणार नाहीत.वेळेवर बिल अदा न केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) खराब होईल आणि तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही. चला तर समजून घेऊयात क्रेडिट कार्ड आणि युपीआय लिंक केल्याने क्रेडिट स्कोर कसा सुधारला जाईल ते.
क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी सर्वात चांगला मार्ग म्हणजे क्रेडिट रिपोर्ट नेहमी तपासा. या अहवालातून तुम्हाला चुका लक्षात येतील. ज्या तुम्ही सुधारु शकता. युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक केल्यावर अहवाल तपासणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही बारीकसारीक गोष्टींसाठी तुम्ही खर्च कराल. अशावेळी खर्चाचा आवाका तुमच्या लक्षात येणार नाही. वाढता खर्च वेळेत अदा नाही केला तर त्याचे दुष्परिणाम तुम्हालाच सहन करावे लागतील. अहवालातून तुम्ही केलेला कोणता खर्च योग्य आहे नी कोणता अयोग्य आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. क्रेडिट स्कोर नहेमी या अहवालावर अवलंबून असतो हे वेगळं सांगायला नको.
युपीआयद्वारे क्रेडिट कार्डचा पैसा खर्च करात असाल तर बिल पेमेंटवर लक्ष द्या. या महिन्यांचे बिल दुस-या महिन्याच्या तारखेला वेळेत अदा करा. ही तारीख चुकल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. त्यामुळे एकतर तुम्ही पेमेंट अदा करण्याची तारीख लक्षात ठेवा किंवा त्यासाठीचा अलर्ट लावा. ऑटो डेबिट सुविधेआधारे तुम्हाला वेळेत बिल अदा करता येईल आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही वाढवता येईल.
या सर्व प्रक्रियेत, तुम्हाला एकदा खर्चाची सवय लागल्यास ही बाब तुमच्यासाठी डोकेदुखी वाढवणारी ठरेल. क्रेडिट कार्डचा वापर जेवढा जास्त तेवढा त्याचा युटिलायझेशनचा रेशोही जास्त असेल. क्रेडिट कार्ड स्कोर तेव्हाच योग्य मानल्या जातो, जेव्हा त्याचा वापर 30 टक्क्यांपेक्षा कमी असेल. जर तुमच्याकडे अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड असतील आणि विविधी युपीआय पेमेंटशी तुम्ही ते जोडले असतील तर सर्वांवर तुम्हाला लक्ष ठेवावा लागेल. जर तुमच्या क्रेडिट कार्डची खर्च मर्यादा एक लाख रुपये असेल तर याचा अर्थ तुमचा खर्च हा 30 हजार रुपयांपर्यंत असावा.