प्रत्येकाला दिवसातून किमान एक किंवा दोनदा तरी बँकेकडून क्रेडिट कार्डसाठी फोन येतो. अनेकवेळा तुम्ही त्यांना नकार देऊनही त्यांचा फोन यायचा काही बंद होत नाही. बँक इतर कोणत्या गोष्टींसाठी नाहीपण क्रेडिट कार्डसाठी मागे लागतात. शॉपिंग मॉल, स्टेशन किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी काही तरूण-तरूणी क्रेडिट कार्ड आपल्यासाठी किती महत्त्वाचं हे समजून सांगत असतात. याच्यामागे कारणंही तितकंच मोठं आहे. क्रेडिट कार्डचं महाजाल देशभरात पसरलंय. पण तुम्हाला माहिती का तुमच्या खिशातील क्रेडिट कार्डने किती जणांना फायदा होतो? जाणून घ्या.
बँक तुम्हाला एक असं कार्ड देते ज्यामध्ये एक ठराविक रक्कम दिली जाते. ती रक्कम तुम्ही एक महिन्साठी कोणत्याही व्याजाशिवाय वापरू शकता. मात्र ठरलेल्या कालावधीमध्ये तुम्हाला ती रक्कम भरावी लागते. ग्राहकांना वारंवार पैसे काढण्यासाठी बँकेत यावं लागू नये यासाठी डेबिट कार्ड दिलं. त्यानंतर ग्राहकांना एक मिनी लोनसारखी सेवा देण्यासाठी क्रेडिट कार्ड दिलं गेलं.
क्रेडिट कार्डची सायकल कोणालाही आकर्षित करण्यासारखी असते. कारण तुम्ही जी रक्कम वापरता ती तुम्हाला 50 दिवसांमध्ये परत करावी लागते. तुम्ही वापरलेली रक्कम वेळेत भरली तर कोणताही दंड किंवा अतिरिक्त रक्कम तुम्हाला भरावी लागत नाही. एक क्रेडिट कार्ड वापरताना त्यामध्ये चार जणांचा सहभाग असतो. सगळ्यात महत्त्वाचा रोल हा नेटवर्क कंपनीचा असतो. नेटवर्क कंपनी नेमकी काय भूमिका बजावते? समजून घ्या. सुरूवातीला ATM म्हणजेच डेबिट कार्ड ज्या बँकेच्या आहेत त्याच बँकांमधून पैसे काढता येत होते. मात्र आता तुम्ही कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकता. कारण नेटवर्क कंपन्यांनी यामध्ये मध्यस्थी केल्याने हे शक्य झालं.
ज्या बँकेचं ATM असेल त्यामधूनच ग्राहक पैसे काढू शकत होते. कारण बँक एकमेकांना आपल्या ग्राहकांच्या डिटेल्स देत नव्हते. कारण जर ग्राहकांचा Data शेअर केला तर एखादी बँक दुसऱ्या कोणत्याही बँकेचे प्रीमियम ग्राहक असतील त्यांना चांगल्या ऑफर्स देऊन आपल्याकडे खेचू शकते. त्यामुळे हे कारणही योग्य होतं. पण यामुळे प्रत्येक बँकेला सगळीकडे ATM मशीन लावावे लागले असते. याचा खर्च मोठ्या प्रमाणात होणारा होता. यावर एक उपाय करण्यात आला तो म्हणजे नेटवर्क कंपन्यांकडे सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांच्या डिटेल्स दिल्या. याच्या सुरक्षेची जबाबदारीही नेटवर्क कंपन्यांनीच घेतली. त्यामुळे कोणत्याही बँकेच्या ATM मध्ये गेल्यावर डेबिट कार्डमागील चिप स्कॅन होते तेव्हा नेटवर्क कंपनी सर्व डिटेल्स पाहते आणि Verify झाल्यावर पैसे ग्राहकांना काढता येतात. VISA, MasterCard, Rupay आणि American Express या कंपन्या सर्व Details पडताळून पाहतात. यामधील Rupay ही भारतीय कंपनी आहे. American Express आणि VISA या कंपन्या अमेरिकन असल्यामुळे भारत सरकारने यांना सर्व डाटा भारतामध्ये ठेवण्यास सांगितला. या कंपन्यांचे डाटा सेंटर हे भारतातच आहेत.
Network Company – (नेटवर्क कंपनी)
Issure Bank – (इश्युर बँक) -ग्राहक वापरत असलेल्या क्रेडिट कार्डची बँक
Accuring Bank – (अॅक्युरिंग बँक)- ज्या बँकेमध्ये पैसे जमा होतात
Shopkeeper – (दुकानदार)
बँकेच्या ग्राहकाने आपलं क्रेडिट कार्ड स्वाईप केल्यावर नेटवर्क कंपनी ट्रान्झिशन डिटेल्स चेक करून Issure बँक आणि Accuring बँकेची पडताळणी करतात. त्यानंतर ट्रान्झिशन होतं. याचा फायदा बँक आणि नेटवर्क कंपनीला कसा होतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, समजा १०० रूपयांच्या ट्रान्झिशनसाठी HDFC बँकेचं क्रेडिट कार्ड ग्राहकाने दुकानामध्ये स्वाईप केलं तर HDFC बँक ही Issure Bank होते. दुकानदाराकडे असलेलं मशिन IDFC बँकेचं असेल तर ती बँक Accuring Bank होते. शंभर रूपयांच्या ट्रान्झिशनमधील दोन रूपये हे ग्राहकाजवळ असलेल्या बँकेला, त्यातील दुकानाराकडे असलेल्या बँकेत 98 रूपये जातात आणि Accuring Bank यातला स्वत:ला एक रूपया ठेवते. नंतर 50 पैशे नेटवर्क कंपनीला देते आणि आपल्याला 50 पैसे घेते. याचा Percentage कमी-जास्त होत असतो.
क्रेडिट कार्ड ज्या बँकचं असतं त्या बँकेल जास्त प्रमाणात नफा होतो. कोणत्याही ग्राहकाने घेतलेली रक्कम ही ठराविक कालावधीमध्ये भरली नाही तर बँकांना फायदा होतो. यामध्ये लेट पेंमेंट, ईएमआय इंटरेस्ट, कॅश विथड्रावल फी, ओव्हर द लिमिट, अॅन्युअल फी मधून मोठा फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक बँकेचा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त ग्राहक बनवणे. त्यासाठी बँक एक वेगळी टीमच बँक एंडला टार्गेट बेसेसवर या काम करत असते.
प्रत्येक दुकानदार तुम्हाला मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेताना ईएमआयचा पर्याय देते. त्यासाठी नो कॉस्ट ईएमआय असे सांगितलं जातं पण तुम्ही तसं करून जे काही खरेदी कराल तर त्यामध्ये प्रोसेसिंग चार्जचा समावेश होतो. त्यासोबतच तुम्ही हप्त्यांवर खरेदी करणार असाल तर वस्तुच्या मुळ किमतीमध्ये वाढ होते. इतकंच नाहीतर त्यामध्येच इंटरेस्ट अमाऊंट वाढवतात.
क्रेडिट कार्डमुळे आपल्याला खरेदी करण्याची वाईट सवय लागते. म्हणजे एखाद्या गोष्टीची गरज नसतानाही आपण ती गोष्ट खरेदी करतो आणि इथेच फसतो. कारण बँकेचं टार्गेटही तेच असते की आपल्या क्रेडिड कार्ड धारकांनी जास्तीत जास्त खरेदी करावी. तुमच्याजवळ जितके पैसे येणार असतील त्या आवाक्यातच खरेदी करावी. कारण लेट पेमेंट झालं तर तुम्हाला दंडासह रक्कम भरावी लागते. यामधूनच बँक त्यांचा नफा मिळवतात.
क्रेडिट कार्ड आपल्याला व्यसन लागल्यासारखं होतं, त्यामुळे आपणही मोठेपणात प्रत्येक ठिकाणी ते वापरण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काही अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला त्याच्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. पेट्रोल पंपवर क्रेडिट कार्ड वापरलं तर त्यावर सर्व्हिस फी 1 टक्के आणि जीएसटी 7.2 टक्के आकारला जातो. आयआरसीटीसीवर (IRCTC) बुकींग करताना कार्ड वापरलंत तर 1-2 % टक्के एक्सट्रा पैसे घेतले जातात. पेटीएम, गुगल पे, अॅमाझॉन यांच्या वॉलेटमध्ये तुम्ही पैसे घेतले तर 2-3 % टक्के जास्त घेतले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे cast withdraw करणे आणि एका क्रेडिट कार्डवरून दुसऱ्या क्रेडिट कार्डवर पैसे पाठवणे या सर्वांसाठी तुमच्याकडून ज्यादाचे पैसे घेतले जाऊ शकतात.
बाजारात आता अनेक क्रेडिट कार्ड आहेत, त्यामधील नेमकं कोणतं कार्ड घ्यायचं? असा प्रश्न अनेकवेळा पडतो. त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्यांची पडताळणी तुम्ही कार्ड घेण्याआधी करायला हवी. जेणेकरून त्यानंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यासाठी अनेक बँक तयार असतात पण कोणत्या कार्डवर जास्त आणि कमी दंड किंवा वर्षाची रक्कम आकारली जाते पाहा. कारण तुम्हाला कार्ड देताना अनेक कंपन्या सांगतात की आमचं कार्ड फ्री आहे त्यासाठी आम्ही वर्षाला कोणताही चार्ज लावत नाही. पण तो फक्त एक वर्षासाठी त्यानंतर ते पैसे आकारतात.
प्रत्येक क्रेडिट कार्डला लेट पेंमेंट केल्यावर दंड स्वरूपात जी रक्कम आकारली जाते ती वेगवेगळ्या स्वरूपात असते. त्यामुळे क्रेडिट कार्ड घेताना सर्व कार्डांविषयी माहिती घेऊन कमी व्याज कोणत्या कार्डवर घेतलं जातं हे पाहावं. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगसाठी कार्ड हवं असेल तर तशा ऑफर्स देणारं कार्ड घ्यायला प्राधान्य द्यावं.
क्रेडिट कार्डच्या बिल पेमेंटबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार आला बिल भरण्याचा तारीख गेली तीन दिवसांचा अधिकचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही. त्यामुळे त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोरवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे तुम्ही एखाद्या महिन्यात पैसे भरण्याची तारीख विसरलात तरी पुढील तीन दिवस तुमच्या हातात असतात. बहुतांश लोकांना या नियमाबद्दल माहिती नाही.