Cyber Insurance : नुकसान भरपाई मिळणार! ऑनलाईन फसवणुकीवर रामबाण उपाय

| Updated on: Aug 29, 2023 | 3:20 PM

Cyber Insurance : Cyber Insurance, तुम्हाला ऑनलाईन फसवणुकीत नुकसान भरपाई मिळवून देऊ शकतो. वाहन आणि जीवन विम्याप्रमाणेच सायबर इन्शुरन्स कामी येतो. यामध्ये अनेक ऑनलाईन धोक्यापासून संरक्षण मिळते. हा विमा खरेदी करणारे फार कमी लोक आहेत. पण सायबर गुन्ह्याची व्याप्ती पाहता सगळ्यांनी हा विमा घेणे आवश्यक आहे.

Cyber Insurance : नुकसान भरपाई मिळणार! ऑनलाईन फसवणुकीवर रामबाण उपाय
Follow us on

नवी दिल्ली | 29 ऑगस्ट 2023 : सध्याचे युग डिजिटलचे आहे. इंटरनेटच्या सहाय्याने घरबसल्या अनेक गोष्टी तुम्ही अगदी काही मिनिटात पूर्ण करु शकता. एखाद्याच्या खात्यात रक्कम पाठवायची असेल तर आता बँकेत जाऊन रांगेत उभे राहायची गरज नाही. अवघ्या काही स्टेप्सद्वारे पैसा दुसऱ्याच्या खात्यात हस्तांतरीत करता येतो. इंटरनेच्या (Internet) क्रांतीने हा बदल झाला आहे. पण अनेकदा छोट्या चुका, तांत्रिक गोष्टीचा फायदा उठवत सायबर फ्रॉडच्या, ऑनलाईन फसवणुकीच्या घटना घडतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार घेतात. ते बँकेची हुबेहुब वेबसाईट तयार करतात, बँकेच्या मॅसेज सारखा मॅसेज पाठवतात. कस्टमर केअरवरुन बोलत असल्याची बतावणी करतात आणि तुमची कष्टाची कमाई अवघ्या काही सेकंदात गायब करतात. असे प्रकार आता गावखेड्यात पण घडत आहे. बँका अनेकदा याविषयीचा अलर्ट मॅसेज पाठवते. पण तरीही एक चूक महागात पडते. अशावेळी ग्राहकांना सायबर विमा (Cyber Insurance) महत्वाचा ठरतो. या विम्यामुळे नुकसान भरपाई मिळते.

काय असतो सायबर विमा?

वाहन आणि जीवन विम्यासारखाच सायबर विमा असतो. सायबर फसवणुकीच्या वेळी हा विमा कामी येतो. तो नुकसान भरपाई मिळवून देतो. अर्थात त्यासाठी अटी व शर्ती आहेतच. पण त्याआधारे नुकसान झाले म्हणून भरपाई मागता येते. तुमचे नुकसान भरुन काढण्यासाठी हा विमा फायदेशीर ठरतो.

हे सुद्धा वाचा

कशापासून मिळते संरक्षण

सायबर विम्यात अनेक फसवणुकीपासून संरक्षण मिळते. यामध्ये ऑनलाईन चोरी, सायबर बुलिंग, अनाधिकृत डिजिटल व्यवहार, सोशल मीडिया जबाबदारी, व्हायरस अटॅक, ऑनलाईन शॉपिंगमधील फसवणूक, डेटा ब्रिच, ओळखीचा गैरफायदा घेऊन केलेली फसवणूक अशा अनेक फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण मिळते. त्यांना विम्याच्या आधारे नुकसान भरपाई मिळते. विम्याच्या रक्कमेनुसार प्रीमिअम मिळतो.

या कंपन्या देतात सायबर विमा

1. SBI General Cyber Vault Edge

2.Bajaj Allianz Individual Cyber Safe Insurance Policy

3.HDFC Ergo Cyber Sachet Insurance

नवीन विमा पर्याय

बाजारात नवीन विमा पॉलिसी दाखल झाल्या आहेत. त्यात परताव्याची हमी मिळते. या पॉलिसी 7 ते 7.5 टक्क्यांचा परतावा देतात. पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा हा रिटर्न अधिक आहे. या योजनांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक प्रीमियम अगदी करमुक्त आहे. जर एखादी व्यक्ती या योजनेत 5 वर्षांकरीता दरमहा 20,000 रुपये गुंतवणूक करत असेल तर तो या योजनेत 12 लाख रुपयांची गुंतवणूक करतो. दहा वर्षांत या योजनेत ही रक्कम 20.5 लाख रुपये होईल.