खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (employee) पेन्शन योजनेची (Pension plan) माहितीच नसते. मूळ वेतनाच्या 12 टक्के रकमेत स्वत:चं योगदान तेवढंच कंपनीचं (company) योगदान पीएफ खात्यात जमा होते, फक्त एवढीच माहिती असते. मात्र, कंपनीकडून करण्यात येत असलेल्या ईपीएफमधील योगदानातील बहुतांश हिस्सा कर्मचारी पेन्शन स्कीम म्हणजेच ‘ईपीएस’मध्ये जमा करण्यात येतो. बहुतांश कर्मचाऱ्यांचा पगार कमी असतो त्यामुळे मोठी रक्कम उभारता येत नाही. अशावेळी बहुतांश कर्मचारी निवृत्तीनंतर उदरनिर्वाहासाठी फार मोठया रक्कमेची गुंतवणूक करू शकत नाहीत. निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना दर महिना उत्पन्नाचं साधन मिळावं यासाठी कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएस-95 सुरू करण्यात आली. सध्याच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अधिक महागाई भत्त्याच्या 12 टक्के योगदान ईपीएफमध्ये जमा करण्यात येते. काही कंपन्या पूर्ण पगारावरही योगदान वजा करतात. कर्मचाऱ्याच्या पगारातून वजा होणारी 12 टक्के रक्कम त्यांच्या पीएफ खात्यात जमा होते. तर संस्थेकडून करण्यात येणारे योगदान पूर्णपणे ईपीएफमध्ये न जाता दोन भागात विभागाले जाते. यातील 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा होते तर उर्वरित 8.33 टक्के रक्कम पेंशन खात्यात जमा होते.
ईपीएफसाठी सध्या मूळ पगार हा जास्तीत जास्त 15,000 रु. प्रतिमहिना निश्चित करण्यात आलाय. अशावेळी जास्तीत जास्त 1250 रुपये जमा होऊ शकतात. कर्मचाऱ्याच्या ईपीएफमध्ये सरकारकडून 1.16 टक्के योगदान देण्यात येते. कर्मचारी 58 वर्षाचा झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. मात्र, काही वेळी अटींची पूर्तता केल्यानंतर वयाच्या 50 व्या वर्षीसुद्धा पेन्शन मिळू शकते. मात्र सतत 10 वर्ष ईपीएफ खात्यात योगदान दिल्यानंतरच पेन्शन मिळते.
पेन्शनची रक्कम कशी निर्धारित केली जाते हा कर्मचाऱ्यांना नेहमीच प्रश्न पडत असतो. यासाठी ईपीएफचा एक फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्ही पेन्शनची रक्कम निर्धारित करू शकता जर कोणताही कर्मचाऱ्याचा सेवाकाळ हा 20 वर्षाचा असेल तर त्यात दोन वर्ष बोनस म्हणून जोडले जातात. वर्षाची गणना राऊंड फिगरमध्ये करण्यात येते. पेन्शन योग्य सेवा 10 वर्ष सहा महिने असेल तर 11 वर्षांची सेवा गृहित धरली जाते. सहा महिन्यापेक्षा कमी कालावधी असल्यास सोडून दिला जाते. उदाहरणार्थ मयूर याची गेल्या एक वर्षाचा सरासरी पगार म्हणजे बेसिक + डीए 15000 रु. आणि पेंशन योग्य नोकरीचा कालावधी 21 वर्ष असल्यास त्याला 15,000(बेसीक) गुणीले 21 वर्ष नोकरीचा कालावधी भागीले 70 केल्यानंतर म्हणजेच मयूरला 4,500 पेंशन मिळणार. कर्मचारी पेंशन योजना 15 नोव्हेंबर 1995 पासून लागू करण्यात आलीये. या योजनेनुसार सध्या कमीत कमी पेंशन 1,000 रु. आणि जास्तीत जास्त पेंशन 7,500 रु. मिळते. महागाईच्या दराची तुलना केल्यास ही रक्कम खूप कमी आहे. मात्र, कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी ही योजना खूप चांगली आहे. तसेच वृद्धापकाळात उदरनिर्वाह करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.
आता बसणार गुणवत्तेबाबतच्या तडजोजीला आळा; सोयाच्या प्रत्येक उत्पादनावर ISI मार्क वापरण्याचे आदेश
कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ