नवी दिल्ली | 30 नोव्हेंबर 2023 : आता पती, पत्नीच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने घर खर्चासाठी रक्कम हस्तांतरीत करतात. तिच्या खात्यात रक्कम जमा झाली की, डिजिटल पेमेंटच्या मदतीने ती अनेकांचे बिल अदा करते. ऑनलाईन खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करते. घरच्या खर्चाचे बजेट पत्नीच्या हाती असते. पती तिच्या हातात रक्कम टेकवतो अथवा तिच्या खात्यात ही रक्कम जमा करतो. त्यातून किराणा, दूध, भाजीपाला, किरकोळ खर्च, अचानक होणार खर्च, पेपरचे बिल अशा अनेक गरजांसाठी ही रक्कम खर्च करण्यात येते. घर खर्चासाठी पती जी रक्कम देतो, त्यावर पत्नीला आयकर भरावा लागतो का? काय सांगतो याविषयीचा नियम…
काय पत्नीला द्यावा लागतो टॅक्स?
तुम्ही घर खर्चासाठी पत्नीच्या खात्यावर रक्कम हस्तांतरीत करत असाल तर पत्नीला कोणताही कर द्यावा लागत नाही. म्हणजे आयकर खाते पत्नीला कोणतीही नोटीस पाठवणार नाही. कारण पती अगोदरच त्याच्या उत्पन्नावर कराचा भरणा करत आहे. एकाच रक्कमेवर दोनदा इनकम टॅक्स द्यावा लागत नाही. पत्नीला पती जी रक्कम घर खर्चासाठी देतो, ती रक्कम पतीची कमाई, उत्पन्न गृहीत धरण्यात येते. त्यामुळे त्यावर पत्नीला कर द्यावा लागत नाही.
बचत, गुंतवणूक केल्यास काय आहे कराचा नियम
पत्नीला घर खर्चासाठी पैसा मिळाल्यावर पत्नी त्यातून बचत करत असेल. त्यातील काही रक्कम गुंतवणूक करत असेल तर त्यातून होणारी कमाई करपात्र असेल. जर पत्नीने घर खर्चातील रक्कमपैकी काही पैसा एफडी, शेअर बाजार, म्युच्युअल फंडात जमा केला आणि त्यातून तिला करपात्र उत्पन्न मिळाले तर त्यावर तिला कर द्यावा लागतो. पत्नीला करातून सवलतीचा फायदा मिळू शकतो. त्यासाठी तिला ITR फाईल करावा लागतो.
पत्नीला देण्यात येणारी रक्कम असते गिफ्ट
आयकर खात्याच्या नियमानुसार, पत्नीला देण्यात येणारी रक्कम गिफ्ट मानण्यात येते. पत्नी ही नातेवाईकाच्या श्रेणीत येते. त्यामुळेच पत्नीला या पैशांवर कर लागत नाही. पण पतीचे उत्पन्न करपात्र असेल तर त्याला आयकर खात्याच्या नियमानुसार कमाईवर कर अदा करावा लागतो. टॅक्स स्लॅबनुसार ही त्याला कर द्यावा लागतो.