नवी दिल्ली | 13 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान जन धन योजनेतंर्गत (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) बँक खाते उघडले जाते. या खात्यात खातेदाराला अनेक बँकिग सुविधा मिळतात. यामध्ये चेक बुक, पासबुक, अपघात विमा अशा सुविधा मिळतात. पंतप्रधान जनधन योजनेच्या (PM Jan Dhan Yojana) खात्यात रक्कम नसली तरी तुम्हाला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची (Overdraft) सुविधा देण्यात आली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्यात आली. खातेदाराला खात्यात पैसे नसतानाही ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. त्याला खात्यातून पैसा काढता येतो.
ओव्हरड्राफ्टची सुविधा
जन धन योजनेत झिरो बॅलेन्सवर खाते उघडता येते. या खात्यात खात्यात कमीत कमी बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, दंड ही देण्यात येत नाही.
ओव्हरड्राफ्टची मर्यादा किती?
जन धन खात्यात शिल्लक नसेल तरी ग्राहकाला, खातेदाराला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. पण त्यासाठी एक अट आहे. जन धन खाते उघडून कमीत कमी सहा महिने झालेले असणे आवश्यक आहे. तितके जुने तुमचे खाते असावे. त्यानंतर तुम्हाला गरज असेल तेव्हा 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट रुपाने मिळविता येतात. तर खाते उघडल्यानंतर लागलीच 2000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढता येतो.
मिळतात या सुविधा
योजनेत केला होता बदल
या योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने (Central Government) 2018 मध्ये अधिक सुविधा आणि लाभांसह ही योजना पुन्हा नव्याने सादर केली. या योजनेत कोणताही भारतीय नागरीक खाते उघडू शकतो.
कोणती कागदपत्रे गरजेची
कसे उघडता येईल खाते