नवी दिल्ली : आधारकार्ड भारतीय नागरिकांचा महत्वाचा दस्तावेज आहे. कुठल्याही ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करण्यात येतो. तर पॅनकार्ड एकप्रकारे भारतीय नागरिकांच्या आर्थिक घाडमोडींची जंत्रीच आहे. हे दोन्ही कार्ड लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. प्राप्तिकर विवरण पत्र भरण्यासाठी तसेच इतर अनेक कारणांसाठी सरकारने आधार कार्डशी पॅनकार्डची जोडणी (Linking) गरजेची केली आहे. दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरिकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च 2023 पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे. सध्या सशुल्क जोडणी होते. यापू्र्वी आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक करण्याची 31 मार्च 2022 ही अंतिम तारीख होती. पण इंटरनेट समस्या आणि कोरोनाची कारणे देत अंतिम मुदत (Last Date) वाढवण्यात आली.
गेल्या वर्षी 31 मार्च ते 30 जून पर्यंत आधार कार्ड पॅन सोबत जोडण्यासाठी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. 30 जून नंतर आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी नागरिकांना 1000 रुपये मोजावे लागत आहेत. ही मुदत ही 31 मार्च 2023 रोजी पर्यंत आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील. त्यामुळे अद्यापही आधारशी पॅन जोडले नसेल तर लगेचच पुढील परिणाम टाळण्यासाठी लगबग करा.
प्राप्तिकर अधिनियम 1961 नुसार, आसाम, मेघालय आणि केंद्र शासित प्रदेशातील, जम्मू आणि काश्मीरमधील रहिवाशी तसेच अनिवासी भारतीयांना पॅनकार्ड-आधार कार्डच्या जोडणीतून सूट देण्यात आली आहे. 80 वर्षे वयावरील व्यक्ती यांना या लिंकिंग मधून सूट देण्यात आलेली आहे. जर एखादी व्यक्ती भारतीय नागरिक नसेल तर तिलाही या प्रक्रियेतून जाण्याची गरज नाही.
असे करा आधार पॅन कार्ड लिंक
चुकीची माहिती अशी करा दुरुस्त