E-Passport 2.0: लवकरच मिळणार चिप असलेला ई पासपोर्ट, AI तंत्रज्ञानाचा होणार वापर! परराष्ट्रमंत्री स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Jun 24, 2023 | 9:31 PM

जगात पासपोर्ट हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्रं आहे. त्या व्यक्तीची ओळख आणि इतर बाबी या पासपोर्टमुळे स्पष्ट होतात. भारतही आता त्या दृष्टीने पावलं टाकत असून पासपोर्ट अपग्रेड करत आहे. लवकरच भारतीयांना ई पासपोर्ट मिळणार आहे.

E-Passport 2.0: लवकरच मिळणार चिप असलेला ई पासपोर्ट, AI तंत्रज्ञानाचा होणार वापर! परराष्ट्रमंत्री स्पष्टच म्हणाले...
E-Passport 2.0: ई पासपोर्टबाबत मोठी घोषणा, AI तंत्रज्ञानाच्या वापर आणि बरंच काही! परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं की..
Follow us on

मुंबई : पासपोर्ट हे कोणत्याही देशाच्या नागरिकाचं महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी आवश्यक असलेलं कागदपत्रं आहे. भारतात पासपोर्ट अपडेट होणार आहे. म्हणजेच आताच्या पासपोर्टची जागा ई पासपोर्ट घेणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून होत असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतरताना दिसणार आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी पासपोर्ट सेवा दिवसाचं औचित्य साधत पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.0 ची घोषणा केली आहे. या कार्यक्रमांतर्गत लोकांना लवकरच चिप असलेला ई पासपोर्ट मिळणार आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी प्रयत्नशील असलेल्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी कार्यक्रमात सांगितलं की, “भारतातील नागरिकांना आता नवे आणि अपग्रेडेड ई पासपोर्ट मिळणार आहेत.”

काय सांगितलं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी

“पासपोर्ट सेवा लवकरच नागरिकांना विश्वासार्ह, सुलभ आमि पारदर्शक पासपोर्ट सुविधा देईल. चिप असलेला अॅडव्हान्स आणि अपग्रेडेड पासपोर्ट तयार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच AI ची मदत घेतली जाणार आहे.”, असं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितलं.

“आम्ही पंतप्रधान यांच्या ईज ऑफ लाईफ मंत्राला चालना देण्यासाठी योगदान करत आहोत. यातून आम्हाला आणखी पुढे जायचं असून डिजिटल सिस्टम चांगली करायची आहे. ई पासपोर्ट सुविधा आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून तयार केली जाईल. यात पासपोर्ट इनबिल्ड असणार आहे. या माध्यमातून लोकं आरामात विदेश यात्रा करू शकतील. एआय तंत्रज्ञानामुळे लोकांचा डेटा सुरक्षित राहील.”, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं.

जयशंकर यांची मेसेज ट्विटरवर शेअर करत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे की, “परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांचा एक संदेश आहे. आज आम्ही पासपोर्ट दिवस साजरा करत आहोत. परराष्ट्र मंत्रालयाची टीम नागरिकांना विश्वसनीय, सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक पद्धतीने वेळेत पासपोर्ट आणि संबंधित सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचं स्पष्ट करते.”

काय आहे ई पासपोर्ट प्रोग्राम 2.0?

ई पासपोर्ट प्रोग्राम2.0 अंतर्गत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पासपोर्ट तयार केला जाईल. यात लेटेस्ट बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. एआय, अँडव्हान्स डेटा एनालिसिस, चॅट बॉट, लँग्वेज प्रीफरेंजसह क्लाउट कंप्यूटिंगचा वापर करून पासपोर्ट तयार केला जाईल. यामुळे पासपोर्ट तयार करणं सोपं होईल आणि युजर्सचा डेटा सुरक्षित राहील. ई पासपोर्ट सॉफ्टवेअर आयआयटी कानपूर आणि एनआयसीने डेव्हलप केलं आहे.