Easy Payments : बँकेत नाही पैसे, Credit Card पण नाही, तरीही करा खरेदी!

| Updated on: Aug 20, 2023 | 10:17 AM

Easy Payments : बँकेत पैसा नाही, क्रेडिट कार्ड पण नाही तरीही आता तुम्हाला खरेदी करता येणार आहे. आता अनेक पर्याय आले आहेत. त्याआधारे तुम्ही इलेक्ट्रॉनिकसह इतर वस्तूंची खरेदी करु शकाल.

Easy Payments : बँकेत नाही पैसे, Credit Card पण नाही, तरीही करा खरेदी!
Follow us on

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : आजचं युग डिजिटलचं (Digital Era) आहे. आता तर अनेक जण पेमेंट करताना युपीआयचा वापर करत आहे. क्रेडिट कार्डचा पण वापर होतो. पण प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असतेच असे नाही. तसेच खात्यातही रक्कम असतेच असे नाही. अशावेळी खरेदीचा पेच पडतो. एखादी वस्तू घ्यावी वाटते. पण बॅलेन्स नाही तर क्रेडिट कार्ड नाही, मग खरेदी तरी कशी करणार, असा रोकडा सवाल पडणे स्वाभाविक आहे. पण भारताने डिजिटल पेमेंटमध्ये (Digital Payment) मोठी भरारी घेतली आहे. आता तर डिजिटल रुपया पण भारतात येऊ घातला आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मने आधुनिक मंत्र जपत ग्राहकांना खरेदीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. क्रेडिट कार्ड (Credit Card) नसतानाही खरेदीचा पर्याय कंपन्या देत आहेत, काय ही सुविधा?

Easy EMI

अनेक बँका क्युआर कोडचा पर्याय समोर आणला आहे. बँकेचा क्युआर कोड स्कॅन करायचा, युपीआयच्या माध्यमातून ईएमआयचा पर्याय निवडायचा, इतकी सोपी पद्धत आहे. ‘Buy Now, Pay later’ या सोप्या पद्धतीने ग्राहकांना इच्छित वस्तू घेण्यासाठी आता मन मारण्याची गरज नाही. मर्चंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ईएमआयचा पर्याय मिळतो. त्याआधारे वस्तूंची खरेदी करता येते.

हे सुद्धा वाचा

ग्राहकांना फायदा

ही सुविधा केवल ऑफलाईन ग्राहकांसाठी आहे. ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, कपडे, पर्यटन, हॉटेल बुकिंग अशा अनेक सुविधांसाठी त्याचा वापर करता येईल. ग्राहक तीन, सहा वा नऊ महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय निवडू शकतो. 10,000 रुपयांहून अधिकची वस्तू ग्राहकांना खरेदी करता येईल. लवकरच ही सुविधा ऑनलाईन खरेदीसाठी पण सुरु करण्यात येणार आहे.

युझर्ससाठी मिळेल ही सुविधा

आजकाल UPI च्या माध्यमातून पेमेंट होते. ग्राहक मोठ्या प्रमाणात ‘Buy Now, Pay later’ या सुविधेचा आता लाभ घेत आहेत. युपीआय व्यवहार करताना Pay Later चा पर्यया निवडत आहेत. ही लाट पाहता अनेक बँकांनी हे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. अनेक मोठ्या बँका युपीआय माध्यमातून सहज ईएमआयचा पर्याय समोर आणत आहेत. ग्राहकांना महागड्या वस्तू खरेदीचा पण पर्याय मिळाला आहे. त्यांना महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करता येत आहेत. ही प्रक्रिया सुरक्षित, झटपट आणि डिजिटल पद्धतीने पूर्ण होते. त्याची हिस्टरी पण सेव्ह असल्याने ग्राहकांना कोणती वस्तू कधी खरेदी केली याची सहज माहिती मिळते.

पहिली पे लेटर स्कीम

ICICI बँकने 2018 मध्ये ऑनलाइन Pay Later सुविधा सुरु केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस होती. त्यावेळी छोट्या वस्तू खरेदी करता येत होत्या. Pay Later सुविधेमुळे ग्राहकांना ऑनलाईन खरेदी सोपी झाली होती. आता अनेक बँका Pay Later सुविधेचा वापर करत आहे. युपीआय पेमेंटला सुद्धा ही सुविधा जोडल्याने कोणत्याही युझर्सला त्याचा फायदा होत आहे.