नवी दिल्ली : भारतीय कर्मचाऱ्यांना (Indian Employees) गल्लेलठ्ठ पगार (Huge Salary) मिळू शकतो, ही काही भविष्यवाणी नाही तर हा एका सर्वेक्षणात हा दावा करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात (Survey) इतर देशातील कर्मचाऱ्यांविषयी आणि त्यांच्या वेतनाविषयी भाष्य करण्यात आले आहे. पण जगापेक्षा भारतीयांचा पगार जास्त असेल असा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
वाढत्या महागाईमुळे पुढील वर्षी फार थोड्या देशात कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल असा दावा या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यानुसार, 37 टक्के देशातील कर्मचाऱ्यांना पुढील वर्षी वेतनात वाढ (Increment) मिळेल.
वर्कफोर्स कन्सल्टन्सी, ईसीए इंटरनॅशनलच्या दाव्यानुसार, वेतनातील वाढीबाबत भारत जगात सर्वात अग्रेसर राहणार आहे. भारतात वार्षिक 4.6 टक्के वेतन वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या अहवालानुसार, वेतनवृद्धीबाबत युरोपात सर्वात मागे असेल. या आघाडीवर युरोपला मोठा झटका बसू शकतो. याठिकाणी वेतनवाढ सोडा, जे वेतन आहे, त्यात कपात होण्याची शक्यता आहे. 1.5 टक्क्यांपर्यंत वेतन कपात होऊ शकते.
ईसीए इंटरनॅशनलने 68 देशातील आणि शहरातील 360 हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांना या सर्वेक्षणात सहभागी करुन घेतले होते. तिथल्या कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया ही त्यांनी नोंदवली होती.
सर्वेक्षणानुसार ब्रिटनला वेतनवृद्धी आघाडीवर सर्वात मोठा फटका बसू शकतो. येथील कामगारांना पुढील वर्ष अत्यंत वाईट जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनात 5.6 टक्क्यांची कपात होऊ शकते.
या वेतनवृद्धीत भारत पुढील वर्षी चीनलाही मागे टाकण्याचा आशा वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार, भारतात वेतनवृद्धी दर 4.6 टक्के राहणार आहे. तर चीनचा वेतनवृद्धी दर 3.8 राहू शकतो.