नवी दिल्ली : कर बचतीसह म्युच्युअल फंडात (Mutual Funds) जोरदार परतावा मिळवता येऊ शकतो. नवीन वर्षात गुंतवणुकीसह कर बचतीचा (Tax Saver) विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी महत्वाची आहे. 31 मार्च जवळ येत आहे. त्यामुळे अनेक करदात्यांना कर वाचविण्याची चिंता सतावत आहे. करदाते अजून गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांना परताव्यासह कर बचत ही करायची आहे. बाजारात अनेक योजना आहेत. पण अशी गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला नुसता पैशा अडकवून ठेवायचा नाही. तर त्यातून फायदाही मिळवायचा आहे. असा पर्याय तुम्हाला म्युच्युअल फंडातील इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) मिळतो.
म्युच्युअल फंड या श्रेणीत प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणुकीवर कर बचतीसह तगडा रिर्टनही मिळतो. या योजनांचा लॉक इन पिरीयड इतर योजनांपेक्षा अत्यंत कमी आहे. इतर अल्पबचत योजनांमध्ये चांगला परतावा मिळण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो आणि त्यावरील व्याजही कमी मिळते. तसेच या योजनांच्या माध्यमातून कर सवलतही मिळत नाही.
एफडी आणि एनसीसी योजना जोखीम मुक्त असतात. पण म्युच्युअल फंडात जोखीम असते. पण परतावा एफडी आणि इतर योजनांपेक्षा तिप्पटीपेक्षा अधिक मिळतो. म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. कर बचत मुदत ठेव योजना 5 वर्षांची असते. तर म्युच्युअल फंडातील या योजनेत लॉक इन पिरियड केवळ 3 वर्षांचा आहे. त्यानंतर तुम्हाला रक्कम काढता येते. पण त्यात नुकसान होऊ शकते. हा कोणत्याही प्रकारे गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुमचा अभ्यास आणि तज्ज्ञांच्या मताशिवाय गुंतवणूक करु नका.
क्वांट टॅक्स योजना
10 वर्षात एकरक्कमी परतावा : 20.69% वार्षिक
1 लाख गुंतवणुकीवर : 6.56 लाख परतावा
10 वर्षांत SIP रिटर्न : 21.55% वार्षिक
10 हजार मासिक SIP : 44.47 लाखांचा परतावा
IDFC टॅक्स ॲडवॉंटेज (ELSS) फंड
10 वर्षात एकरक्कमी परतावा : 16.52% वार्षिक
1 लाखांची गुंतवणूक : 4.61 लाख परतावा
10 वर्षांत SIP रिटर्न : 15.93% वार्षिक
10 हजार मासिक SIP : 32 लाख
DSP कर बचत फंड
10 वर्षांत एकरक्कमी परतावा : 16.22% वार्षिक
1 लाख रुपये गुंतवल्यास : 4.50 लाखांचा परतावा
10 वर्षात SIP रिटर्न : 15.32% वार्षिक
10 हजार मासिक SIP : 30.90 लाख परतावा
बँक ऑफ इंडिया टॅक्स ॲडवॉंटेज फंड
10 वर्षांत एकरक्कमी परतावा : 15.94% वार्षिक
1 लाख रुपयांची गुंतवणूक : 4.39 लाख
10 वर्षांत SIP रिटर्न: 15.53% परतावा
10 हजार मासिक SIP ची किंमत : 31.28 लाख
Axis दीर्घ कालावधी इक्विटी फंड
10 वर्षात एकरक्कमी परतावा : 15.72% वार्षिक
1 लाख गुंतवणुकीची किंमत : 4.30 लाख
10 वर्षांत SIP रिटर्न : 12.76% वार्षिक
10 हजार मासिक SIP ची किंमत : 26.64 लाख