FASTag : पोलिस गेले मर्डर मिस्ट्री सोडवायला, समोर आला FASTag चा घोटाळा..

| Updated on: Oct 13, 2022 | 7:09 PM

FASTag : FASTag चा वापर करुनही घोटाळा करण्यात येत आहे..त्याचेच हे प्रकरण..

FASTag : पोलिस गेले मर्डर मिस्ट्री सोडवायला, समोर आला FASTag चा घोटाळा..
घोटाळा असा की पोलिसही चक्रावले
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : FASTag चा वापर करुनही घोटाळा (Scam) करण्यात येत आहे. यापूर्वी हा विषय चर्चेत आला होता. विंडशील्ड साफ करताना खात्यातील (Bank Account) रक्कम चोरल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण या दाव्याचा पुराव्या अभावी निभाव लागला नाही. पण आता एक अस्सल प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे FASTag चा वापर करताना या चुका नक्की टाळा..

हे घोटाळ्याचे प्रकरण दिल्ली शहरातील आहे. पोलिसांनी प्रकरणात आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे अलिशान गाड्या, एसयुव्ही जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या धोकेबाजांनी एकाच महिन्यात लोकांना 80 लाखांचा चूना लावला आहे.

मर्डर मिस्ट्री सोडविताना पोलिसांनी या रॅकेटचा आणि या घोटाळ्याचा शोध लावला. क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्याच्या नावाखाली आरोपी सर्वसामान्य लोकांना फसवत असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, विविध मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड जप्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी नवीन क्रेडिट कार्ड खरेदी करणाऱ्या ग्राहकाला सावज करत होते. त्यांना बँकेचे अधिकारी म्हणून फोन करत होते. खात्याशी संबंधित माहिती अथवा क्रेडिट लिमिट वाढवण्याचे आमिष दाखवून त्यांच्या खात्याचा तपशील, ओटीपी घेत होते.

फास्टटॅग वॅलेट तयार करुन लोकांच्या खात्यातील थोडी थोडी रक्कम या वॅलेटमध्ये जमा करत होते. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचा संशय जात नव्हता. या ई-वॅलेटमधून रक्कम काढण्यासाठी त्यांनी काही पेट्रोल पंप चालकांची मदत मिळत होती. त्यानंतर ई-वॅलेटमधील पैसा रोखीत जमा होत होता.

फास्टटॅगच्या नावाखाली चालणाऱ्या घोटाळ्याचा प्रकार उघड झाल्यावर पोलिस ही हैराण झाले. त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन हा सर्व प्रकार कसा चालतो हे शोधून काढले.