नवी दिल्ली : सध्या कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनकार्ड ( PANCARD ) एक प्रकारे आपले ओळखपत्रच बनले आहे. त्यामुळे या महत्वाच्या सरकारी ओळखपत्राचा वापर बॅंक खाते उघडण्यापासून ते जवळपास प्रत्येक गोष्टींसाठी होत आहे. परंतू काही वेळा पॅनकार्ड संबंधी घोटाळे ( pan card frauds ) कानावर येत असतात. त्यामुळे आपल्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर तर करीत नाही ना याची पडताळणी कशी करायची ते पाहूया…
पॅनकार्ड (PAN) Permanent Account Number या महत्वाच्या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता असते. आपण आपल्या पॅनकार्डचा वापर लोन घेण्यापासून ते क्रेडीटकार्ड घेणे, सोने घेणे किंवा कोणत्याही महत्वाच्या कामासाठी करीत असतो. त्यामुळे आपले पॅनकार्ड गैरकामासाठी वापरले गेले असेल तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आपल्याला नेहमीच आपल्या पॅनकार्ड बाबत सावधान रहावे लागणार आहे. सतत चेक करावे लागेल कोणी त्याचा गैरवापर कोणी करीत नाही ना
पॅनकार्डच्या गैरवापर कसा ओळखा
* सर्वात आधी आपला क्रेडीट स्कोर चेक करावा
* क्रेडीट स्कोर चेक करण्यासाठी TransUnion CIBIL, Equifax, Experian, Paytm, Bank Bazaar आणि CRIF High Mark सारख्या वेबसाइट्स चा वापर करावा.
* आता वेबसाईट उघडावी
* आता क्रेडीट स्कोर चेक करावा, क्रेडीट स्कोर आपण मोफत चेक करू शकता.
* आता आपण मागितलेल्या सर्व डिटेल्स व्यवस्थित भराव्यात
* आता आपल्या रजिस्टर नंबरवर आपल्याला एक ओटीपी येईल. हा ओटीपी भरावा
* आता आपल्या स्क्रिनवर क्रेडीट कार्ड स्कोर डिटेल्स येतील, त्यावरून आपल्या नावावर काय काय चालू आहे हे आपल्याला कळेल.
तक्रार करण्यासाठी काय करावे
जर तुम्हाला माहिती पडले की आपल्या क्रेडीट कार्डचा कोणीतरी गैरवापर सुरू केला आहे. तर त्याची तक्रार तुम्ही आयकर संपर्क केंद्राकडे ( ) करू शकता.
* सर्वात आधी TIN NSDL च्या पर्यायावर जावे
* आता कस्टमर केअर सेक्शनमध्ये जावे
* आता ड्रॉप डाऊनच्या मेन्यूमध्ये जाऊन Complaints/Queries वर क्लीक करावे
* आता तुमच्या समोर कम्प्लेंट फॉर्म उडला जाईल
* हा कम्प्लेंट फॉर्म नीट भरावा आणि कॅप्चा कोड भरून सबमिट करावा.
पॅनकार्डचा उपयोग :
आयकर विभागाकडे करभरणा करण्यासाठीचे चलन, करविवरणपत्र, (रिटर्नचा फॉर्म) इतर पत्रव्यवहार यावर पॅन क्रमांक लिहणे बंधनकारक असते. तसेच मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन नोंदवावा लागतो. अनेक वेळा ओळखीचा पुरावा म्हणून पॅनकार्डचा उपयोग होतो. कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी 50,000 इतकी किंवा त्याहून अधिक रक्कम जमा करताना पॅनकार्ड अनिवार्य आहे.