SBI Profile Password | SBI प्रोफाइल पासवर्ड विसरलात? या सोप्या पद्धतीने करा रिसेट

| Updated on: Aug 26, 2022 | 7:23 AM

SBI Profile Password | बँकेचे व्यवहार करताना जपून करावे लागतात. त्यात प्रोफाइल पासवर्ड विसरलात तर ऑनलाईनची काही कामे थांबतात. तेव्हा एसबीआयचा प्रोफाइल पासवर्ड कसा रिसेट करायचे ते पाहुयात.

SBI Profile Password | SBI प्रोफाइल पासवर्ड विसरलात? या सोप्या पद्धतीने करा रिसेट
स्टेट बँक
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

SBI Profile Password | आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन बँकिंगसाठी (Online Banking) किती हे पासवर्डचे झंझट. पण ही झंझट नाही तर तुमची बँकेतील ठेव सुरक्षित ठेवण्याची किल्ली आहे. ती चुकून दुसऱ्याच्या हाती लागली तर तुमचं खातं साफ झालं म्हणून समजा. तर प्रोफाइल पासवर्ड (Profile Password) ही तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तो खात्याला अधिक सुरक्षा देतो. तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा असेल, पेमेंटसाठी थर्ड पार्टी जोडताना, डीडी आणि थर्ड पार्टी व्यवहाराची मर्यादा ठरवताना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा बँकेचा ऑनलाईन लॉगिन पासवर्ड बदलतानाही प्रोफाइल पासवर्ड महत्वाचा ठरतो. आता विसराळूपणामुळे म्हणा वा लक्षात न ठेवल्यास तुम्ही पासवर्ड विसरलात तरी तो रिसेट करता येतो. SBI च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, सुरक्षा वाढवण्यासाठी, ग्राहकांनी बहुभाषिक प्रतिमा आधारित व्हर्च्युअल की बोर्ड (MIVKB) वापरणे आवश्यक आहे.

पासवर्ड असा करता सेट

इंटरनेट बँकिंगसाठी लॉग इन करताना ग्राहकाला प्रोफाइल पासवर्ड सेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रोफाइल पासवर्ड लॉगिन पासवर्डपेक्षा वेगळा असतो. तो अक्षर, संख्या, विशिष्ट वर्ण यांचा एकत्रित समुह असतो. तो सहजासहजी चोरता वा क्रॅक करता येत नाही. यावेळी तुम्हाला प्रश्न निवडून त्याचे उत्तर देण्याचा पर्यायही निवडावा लागतो. भविष्यात तुम्ही तुमचा प्रोफाईल पासवर्ड विसरल्यास ओळख पडताळण्यासाठी या प्रश्नाचा वापर होतो.

प्रोफाइल पासवर्ड विसरलात?

तुम्ही प्रोफाईल पासवर्ड विसरल्यास तो रीसेट करता येतो. त्यासाठी पर्याय आहेत.
एटीएम डेबिट कार्ड व्हॅलिडेशनद्वारे सेट केलेल्या संकेत प्रश्न आणि त्याची उत्तरे देऊन तुम्हाला स्वतःला प्रमाणित करणे आवश्यक आहे. तुम्हाला संकेत प्रश्न किंवा उत्तर आठवत नसेल आणि तुमच्याकडे एटीएम डेबिट कार्ड नसेल, तर तुम्ही पासवर्ड रीसेट करण्यासाठी तुमच्या शाखेत संपर्क साधू शकता.

हे सुद्धा वाचा

प्रोफाईल पासवर्ड कसा रीसेट करायचा?

तुम्ही प्रथमच लॉग इन करताना संकेत प्रश्न किंवा उत्तर सेट केल्यास, SBI वेबसाइटनुसार पासवर्ड रीसेट करण्यासाठी तुम्ही संकेत प्रश्न उत्तर वापरू शकता.

संकेत प्रश्न उत्तर वापरून प्रोफाइल पासवर्ड रीसेट करण्यासाठी

1. प्रोफाइल क्लिक करा
प्रोफाइल पासवर्ड विसरला. क्लिक केल्यावर खालील पर्याय समोर येतील. 1.संकेत प्रश्न उत्तर वापरणे 2.शाखेला भेट देऊन 3.एटीएम डेबिट कार्डद्वारे मंजूरी
2. Hint Question Answer वापरून पर्याय निवडा.
3. पहिल्यांदा लॉगिन करताना प्रोफाईल पासवर्डसाठी जो प्रश्न निवडला तो निवडा
4. या प्रश्नाचे उत्तर टाका.
5. सबमिट करुन क्लिक करा. प्रोफाइल पासवर्ड सेट करण्यासाठी नवीन पेज तयार होईल. त्यावर परवानगी मिळेल.
6. नवीन प्रोफाइल पासवर्ड टाका.
7. पासवर्ड पुष्टीसाठी पुन्हा प्रश्न निवडा आणि त्याचे उत्तर ही टाका.
8. सबमिट करुन क्लिक करा. तुमचा नवीन प्रोफाईल पासवर्ड तयार झाला.