ITR Filing : फॉर्म 16 शिवाय ही भरा इनकम टॅक्स रिटर्न! कोणासाठी आहे ही सुविधा

| Updated on: Apr 19, 2023 | 12:02 PM

ITR Filing : फॉर्म-16 (Form-16) हे एक टीडीएस प्रमाणपत्र आहे. तुमचे उत्पन्न, स्त्रोत आणि त्यावरील विविध कर कपात (TDS) यामध्ये सूचीबद्ध असते. आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी हे सर्वात आवश्यक कागदपत्र आहे.

ITR Filing : फॉर्म 16 शिवाय ही भरा इनकम टॅक्स रिटर्न! कोणासाठी आहे ही सुविधा
Follow us on

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2023-24 ची सुरुवात झाली आहे. आता प्रत्येक करदात्याला त्याच्या पात्र उत्पन्नावर इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरावा लागेल. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची मुदत 31 जुलै, 2023 (ITR filing Last Date) आहे. ई-फायलिंग पोर्टलवर आयटीआर भरण्यासाठी पॅनकार्ड, आधार कार्ड, फॉर्म 16, बँक खात्याची सविस्तर माहिती आणि इतर उत्पन्नाचे पुरावे द्यावे लागतात. आयटीआर फाईल करण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचा ई-मेल आयडी प्राप्तिकर विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पण काही प्रकरणात पगारदार व्यक्तीला विना फॉर्म 16 आयटीआर दाखल करता येईल.

फॉर्म 16 विना आयटीआर
फॉर्म 16 हा तुमच्या आर्थिक घडामोडींचा लेखाजोखा आहे. तुमचे करपात्र उत्पन्न किती, याची सर्व माहिती टीडीएस रुपाने फॉर्म 16 मध्ये नमूद असते. अनके कर्मचाऱ्यांचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नाही. त्यासाठी कंपनी त्यांना फॉर्म 16 देत नाही. जर कर्मचाऱ्याला आयटीआर दाखल करायचे असेल तर त्याला विना फॉर्म 16 हे काम करावे लागते.

काय आहे फॉर्म 16?
फॉर्म 16 इनकम टॅक्स रिटर्न जमा करतानाचा अत्यंत महत्वपूर्ण दस्तावेज आहे. यामध्ये तुमचे करपात्र उत्पन्न, स्त्रोत याची माहिती देण्यात येते. करदात्याने किती रक्कम खर्च केली, याची माहिती यामुळे मिळते. किती कर कपात झाली याची माहिती मिळते. आर्थिक वर्षात टीडीएसची माहिती नोंदविता येते. तसेच गुंतवणुकीविषयी माहिती देण्यात येते. जर कंपनी कर्मचाऱ्याचा पगारातून टीडीएस कपात करत असेल तर कंपनी टीडएस सर्टिफिकेट देते.

हे सुद्धा वाचा

फॉर्म 26एएस येईल कामी
जर तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल तर फॉर्म 26AS च्या मदतीने तुम्ही सहज आयटीआर दाखल करु शकता. फार्म 26एएसमध्ये टीडीएस आणि टीसीएसची माहिती देण्यात येते. तसेच इतर करपात्रतेचे विवरण देण्यात येते. यामध्ये सॅलरी स्लीप, HRA स्लीप, आयकर कलम 80 सी आणि 80 डी अंतर्गत गुंतवणूक प्रमाणाची माहिती द्यावी लागते.

आर्थिक प्रोफाईल होईल मजबूत
आयकर रिटर्न दाखल केल्यास तुमचा आर्थिक प्रोफाईल मजबूत होईल. क्रेडिट स्कोअर पण जोरदार होतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बँकेत अर्ज करता, तेव्हा बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. याशिवाय क्रेडिट कार्ड आणि इतर आर्थिक गरजासाठी क्रेडिट स्कोअर आवश्यक असतो.

हे ठेवा लक्षात
तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (विलंबित, सुधारित किंवा अपडेट केलेले) भरल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचा पडताळा केला नाही. ते सत्यापित केले नाही. तर आयकर विभाग ते पुढील प्रक्रियेसाठी घेणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही प्राप्तिकर रिटर्न भरल्याचे नसल्याचे गृहीत धरण्यात येईल.