मुंबई | 17 सप्टेंबर 2023 : जर तुम्हाला बॅंकेत काही काम असेल तर तुमची अडचण होऊ शकते. कारण उद्यापासून तीन दिवस वेगवेगळ्या राज्यातील बॅंकांना सुट्टी आहे. गणेश चतुर्थीमुळे अनेक राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी आहे. त्यामुळे बॅंकेतील काम होणार नाही. शनिवारी आणि रविवारी बॅंका बंदच असतात. गणेश चतुर्थीची सुट्टी 19 सप्टेंबर रोजी आहे. परंतू तुम्हाला तुमच्या राज्यात केव्हा बँक हॉलीडे हे जाणून घेऊ शकता. देशातील अनेक राज्यात मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी साजरी केली जात असते. चला पाहूया आरबीआयच्या निर्णयाप्रमाणे कुठे – कुठे बॅंक बंद आहेत.
आरबीआयच्या जाहीर केलेल्या बॅंक हॉलिडे प्रमाणे गणेश चतुर्थी निमित्त 18 सप्टेंबरला बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद तेलंगणा मध्ये बॅंक बंद असतील. तर 19 सप्टेंबरला अहमदाबाद, बेलापूर, भुवनेश्वर, मुंबई, नागपूर, पणजी येथे गणेश चतुर्थी निमित्त बॅंक हॉलिडे जाहीर केला आहे. 20 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी नुआखाई या कृषी सणामुळे भुवनेश्वर आणि पणजीत बॅंका बंद असणार आहेत. त्यामुळे भुवनेश्वर आणि पणजी येथे 19 आणि 20 सप्टेंबर अशा दिवशी बॅंक हॉलिडे आहे.
1 ) 20 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी आणि नुआखाई सणामुळे कोच्ची आणि भुवनेश्वरमध्ये बॅंक बंद
2 ) 22 सप्टेंबर 2023 रोजी श्री. नारायण गुरु समाधी दिवसामुळे कोच्ची, पणजी आणि त्रिवेंद्रममध्ये बॅंक बंद
3) 23 सप्टेंबर 2023 चौथ्या शनिवारमुळे देशभर बॅंक बंद
4) 24 सप्टेंबर 2023 रविवारमुळे बॅंक बंद आहेत.
5) 25 सप्टेंबर 2023 श्रीमंत शंकरदेव जयंतीमुळे गोवाहाटी बॅंकांना सुट्टी असेल.
6) 27 सप्टेंबर 2023 मिलाद- ए- शरीफमुळे जम्मू, कोच्ची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रममध्ये बँक बंद
7) 28 सप्टेंबर 2023 ईद-ए-मिलादमुळे अहमदाबाद, आयजोल, बेलापूर, बंगलुरु, भोपाल, चेन्नई, डेहराडून, तेलंगाना, इंफाळ, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, रायपूर, रांची मध्ये बॅंक बंद असतील.
8) 29 सप्टेंबर 2023 ईद-ए-मिलाद उन नबीमुळे गंगटोक, जम्मू आणि श्रीनगर बॅंक हॉलिडे असेल
चलनातून बाद करण्यात आलेली 2000 रुपयांची नोट जर तुमच्याकडे असेल तर वेळेत ती बदलून टाका. आरबीआयने या नोटांना बदलून देण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 अशी दिली आहे. गणेश चतुर्थी आणि अन्य सणांमुळे देशातील वेगवेगळ्या भागात बॅंका बंद असल्याने या नोटा बदलण्यासाठी तारखा पाहूनच बॅंकेत जावे लागेल.