असं झटपट काढा प्लॅटफॉर्म तिकीट, नाही लावावी लागणार रांग, एका क्षणात होईल काम

| Updated on: Jul 20, 2024 | 9:43 PM

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार कोणतीही व्यक्ती विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही.विनातिकीट प्रवाशांना रेल्वेच्या नियमानुसार कारवाई केली जाते. आपल्या नातेवाईकांना सोडायला जायचे असल्यास आपल्या देखील प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते.

असं झटपट काढा प्लॅटफॉर्म तिकीट, नाही लावावी लागणार रांग, एका क्षणात होईल काम
Follow us on

भारतीय रेल्वेने अडीच लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. भारतीय रेल्वेचे जाळे जगात चौथ्या क्रमांकाचे आहे. भारतीय रेल्वेचा प्रवास जगात सर्वात स्वस्त आणि मस्त आहे. परंतू उन्हाळी किंवा अन्य हंगामात ट्रेन पकडण्यापेक्षा कमी आणि आपल्या नातेवाईकांना सोडणाऱ्यांची अधिक गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे चेन पुलिंग सारख्या घटनामध्ये वाढ होत आहे. रेल्वेने ही गर्दी कमी करण्यासाठी मध्यंतरी रेल्वे प्लॅटफॉर्मच्या तिकीटाचे दर वाढविले होते. या वाढलेल्या दरामुळे गर्दी कमी होईल. म्हणजे विनाकारण फलाटांवर गर्दी करणाऱ्यांची संख्या कमी होण्यासाठी रेल्वेने हा उपाय योजला होता. परंतू यासाठी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करण्यासाठी रांगा लावण्याची काहीही गरज नाही. तुम्ही ऑनलाईन देखील प्लॅटफॉर्म तिकीट विकत घेऊ शकता. कसे ते पाहूया..

अनेकवेळा रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना उतरवण्यासाठी कुटुंबे स्टेशनवर आल्याचे दिसून येते. परंतु कोणतीही व्यक्ती जी भारतीय रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर येते आणि जर तो प्रवास करत नसेल. त्यामुळे अशा प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते. अन्यथा, पकडले तर टीसी चालान काढतो. आता तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म तिकीट देखील खरेदी करू शकता, कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

UTS ॲपद्वारे तिकीट खरेदी

ऑनलाइन तिकीट विकत घेण्यासाठी भारतीय रेल्वेने एक ॲप तयार केले आहे. या ॲपचे नाव युटीएस ॲप असे आहे. त्यास अनारक्षित तिकीट प्रणाली ( UTS App ) देखील म्हणतात. UTS ॲप अँड्रॉइडसाठी Google Play Store आणि iOS साठी ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध असते. या ॲपचा वापर करून तुम्ही तिकीटांच्या रांगेत उभे न राहता सहजपणे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकता. इथे तुम्हाला पेपरलेस तिकीट खरेदी करण्याची सुविधा देखील असते.आपण UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा आर वॉलेटद्वारे पेमेंट करू शकता. तिकीट बुक केल्यानंतर तुमचे ई- तिकीट तुमच्या फोनमध्ये आपोआप सेव्ह होते.

प्लॅटफॉर्म तिकीट किती काळ वैध

प्रवासी प्लॅटफॉर्म तिकीट विकत घेऊन अनेक तास प्लॅटफॉर्मवर टाईमपास करीत असताना अनेकदा पाहायला मिळते. पण या काळात तुम्हाला रेल्वेच्या तिकीट तपासणीसाने पकडले तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. भारतीय रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाचा कालावधी निश्चित केला आहे. कालावधी संपल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिकीट खरेदी करावे लागेल.अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर फक्त दोन तास थांबता येते. यापेक्षा जास्त वेळ थांबायचे असल्यास त्याला पुन्हा नवीन प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागेल.