नवी दिल्ली | 25 नोव्हेंबर 2023 : नोव्हेंबर महिन्यात दिवाळीमुळे आणि इतर दिवस लक्षात घेता सुट्यांचा सुकाळ होता. डिसेंबर महिन्यात सणांची रेलचेल नसली तरी देशभरात 18 दिवस सुट्या मुक्काम ठोकणार आहेत. कर्मचारी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संपावर जाण्याची शक्यता आहे. बँक कर्मचारी 6 दिवसांच्या संपावर जाण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा फटका कामकाजावर दिसेल. त्यामुळे पुढील महिन्यात कामकाज कमी आणि सुट्या अधिक असा मामला होऊ शकतो. तेव्हा बँकेशी संबंधित काही कामकाज असेल तर ते लवकर पूर्ण करा. दैनंदिन व्यवहार तुम्हाला ऑनलाईन बँकेद्वारे पूर्ण करता येतील.
6 दिवसांची संपाची घोषणा
अखिल भारतीय बँक कर्मचारी महासंघाने (AIBEA) डिसेंबर महिन्यात 6 दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. देशभरातील बँकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम होईल. 4 डिसेंबर रोजी पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी संपावर असतील. तर इतर तारखेला इतर बँकेतील कर्मचारी संपावर जाणार आहेत.
ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.
अशा जाहीर होतात सुट्या
भारतीय रिझर्व्ह बँक तीन श्रेणीत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी जाहीर होते. या सुट्या शनिवारी आणि रविवार व्यतिरिक्त दिल्या जातात. दसरा, दिवाळी आणि इतर सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.
देशभरातील बँकांना डिसेंबर महिन्यातील सुट्या