Electric Vehicles : सध्या पेट्रोलच्या किंमती (fuel cost) गगणाला भिडल्या आहेत. अशात लोक चारचाकी तर सोडाच परंतु दुचाकी घेतानाही विचार करीत आहेत. वाहन घेतले तरी त्यात ओतायचं काय? असा प्रश्न अनेकांसमोर निर्माण झाला आहे. पेट्रोलच्या किंमतीत रोज नवीन वाढ होत असल्याने अनेक जण दुचाकी घेण्यास मागेपुढे पाहात आहेत, परंतु अशात इलेक्ट्रिक वाहने (electric vehicles) एक चांगला पर्याय म्हणून समोर येत आहेत. आज या लेखातून आम्ही तुम्हाला काही इलेक्ट्रिक दुचाकींची माहिती देणार आहोत, ज्या अगदी तुमच्या बजेटमध्ये (Budget) उपलब्ध आहेत. शिवाय यातून तुम्हाला एक चांगला मायलेजदेखील मिळू शकतो.
ही स्कूटर ग्राहकांसाठी केवळ 45 हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. 6 ते 8 तासांमध्ये चार्ज होउ शकते. तसेच या स्कूरची रेंज 65 किमी पर्यंत आहे. या स्कूटरचा स्पीड 24 किमी प्रतितास इतका आहे.
ही स्कूटर ग्राहकांना दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. विना बॅटरी पॅकसोबत ही ई-स्कूटर 45, 099 रुपयांना आहे, तर बॅटरी पॅक सोबत तिची किंमत 68,999 इतकी आहे. ही या दुचाकीची एक्स शोरुम किंमत आहे. ही स्कूटर चार तासांमध्ये पूर्ण चार्ज होते. तिची रेंज 85 किमी प्रतितास आहे.
ही स्कूटरदेखील दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. एक व्हेरिएंट एलएक्स व्हीआरएलए आणि दुसरे व्हेरिएंट एलएक्स हे आहे. या स्कूटरचा जास्तीत जास्त स्पीड 25 किमी प्रतितास इतका आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही स्कूटर एक वेळा फूल चार्ज केल्यानंतर 85 किमीपर्यंत चालू शकते.
या स्कूटरमध्ये दोन व्हेरिएंट आहेत. एक सिंगल बॅटरी पॅक तर दुसरे डबल बॅटरी पॅकसोबत उपलब्ध आहे. पहिल्या व्हेरिएंटमध्ये स्कूटरची रेंज 60 किती तर दुसर्या व्हेरिएंटची रेंज 110 किमी इतकी आहे. दोन्ही व्हेरिएंटचा स्पीड 45 किमी प्रतितास आहे.
ही स्कूटर एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची एक्स शोरुम किंमत 62 हजार 499 इतकी आहे. स्कूटरमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, एलईडी इल्युमिनेशन, जिओ टॅगिंग, आणि जिओ फेसिंगसारखे फिचर्सदेखील आहेत. सहा ते सात तासांमध्ये ही स्कूटर चार्ज होते. स्पीड 25 किमी प्रतितास आहे. रेंज 60 ते 70 किमी आहे.