नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतींनी नवीन उच्चांक (Gold New Record) गाठला. मंगळवारीच सोन्याच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले. भारतीय सराफा बाजारात किंमत कायम होती. तर वायदे बाजारात (Multi Commodity Exchange) सोन्याचा भाव थोडा उतरला. चांदीची चमक थोडी फिक्की पडली. तरीही चांदी गेल्या (Silver Rate) सहा महिन्यात वधारली आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 असा उच्चांकी होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा रेकॉर्ड तयार केला होता. गेल्या विक्रमापेक्षा यावेळी सोन्याच्या किंमतींत 1000 रुपयांची तेजी दिसून आली. सोन्याचे भाव अजून वधारतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काळात सोन्याचा भाव 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचेल. तर चांदीचा भाव 80 हजार रुपयांच्या पुढे जाईल. बुधवारी वायदे बाजारात (MCX) सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. पण सराफा बाजारात सोन्याच्या भावात तेजी कायम आहे.
बुधवारी वायदे बाजारात दुपारी 1 वाजेदरम्यान सोने 109 रुपयांनी घसरले. सोने प्रति 10 ग्रॅम 56860 रुपयांवर व्यापार करत होते. तर चांदीत 69 रुपयांची घसरण होऊन ते 68473 रुपये प्रति किलोवर व्यापार करत होते. वायदे बाजारात भाव कमी झाले असले तरी सराफा बाजारात तेजी दिसून आली.
सराफा बाजारात बुधवारी सोने-चांदीच्या किंमती किचिंत घटल्या. इंडिया बुलियन्स असोसिएशनने (ibjarates.com) बुधवारी सकाळी किंमती जाहीर केल्या. 24 कॅरेट सोन्यात जवळपास 190 रुपयांची घसरण झाली. सोने 57138 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर चांदीत 190 रुपयांची घट होऊन किंमती 67947 रुपये प्रति किलो झाल्या.
विना जीएसटी बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 56909 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 52338 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याची किंमत 52854 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या. मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57322 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.