नवी दिल्ली : दिवाळीनंतर सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहे. सोन्याने आज नवीन उच्चांक गाठला. सोन्याचे भाव (Gold Price Update) आज 57,000 रुपयांच्या पुढे पोहचले. तर मरगळ झटकून चांदीनेही आगेकूच केली आहे. गेल्या आठवड्यापासून चांदीत सातत्याने घसरण सुरु होती. चांदीला चमक आली आहे. चांदीचा भाव आज 68,000 रुपयांच्या (Silver Price Today) पुढे पोहचला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. त्याचा परिणाम स्थानिक सराफा बाजारात दिसून आला. सोन्याचा भाव लवकरच 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
वायदे बाजारात (Multi Commodity Exchange – MCX) सोन्याच्या भावात 0.45 टक्क्यांची वाढ झाली. सोने आज 57071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत आहे. तर चांदीच्या भावात 0.55 टक्क्यांची वाढ झाली. 24 जानेवारी 2023 रोजी चांदी 68,340 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात जोरदार तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात 0.2 टक्क्यांची वाढ दिसून आली. सोने 1,935.69 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होते. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली. आज चांदीच्या दरात 0.4 टक्क्यांची वाढ होऊन भाव 23.54 डॉलर प्रति औसवर पोहचला.
येत्या काही दिवसात सोने प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपये भाव गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मद्रास ज्वेलर्स अँड डायमंड मर्चेंट्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोने लवकरच 60,000 रुपयांचा दर गाठेल. गुंतवणूकदारांचा त्यामुळे मोठा फायदा होणार आहे.
ibja केंद्र सरकारने घोषीत केलेल्या सुट्यांच्या दिवशी, शनिवार आणि रविवारी दर जाहीर करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या किरकोळ भाव जाणून घेण्यासाठी ग्राहकांना 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस करुनही किंमती माहिती करुन घेता येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बेस इंपोर्ट प्राईसमध्ये (Base Import Price) वाढ केली आहे. तर चांदीवरील बेस इंपोर्ट प्राईस घटवली. त्याआधारे सोने-चांदी आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर आकारण्यात येईल.