आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) वाढ झाली आहे. आज सलग चौथ्या दिवशी सोने (Gold), चांदीचे ( Silver) दर वधारले आहेत. आज 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा ( दहा ग्रॅम) 54 हजार 60 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरट सोन्याचा दर हा 49550 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी 24 कॅरट सोन्याचा भाव प्रति तोळा 53, 450 रुपये इतका होता. तर 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 49,350 एवढा होता. आज 24 कॅरट आणि 22 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळा अनुक्रमे 410 आणि 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील चांगलीच तेजी दिसून येत आहे. चांदीचा दर आज प्रति किलो सत्तर हजारांवर पोहोचला आहे. गुरुवारी चांदीचा दर 67 हजार रुपये इतका होता. याचाच अर्थ आज चांदीच्या दरात किलोमागे तब्बल तीन हजारांची वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 24 कॅरट सोन्याचा दर 49550 रुपये तोळा तर 22 कॅरट सोन्याचा दर हा 49550 इतका आहे.
आज सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत 22 कॅरट सोन्याचा दर 49,350 एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 54 हजार 60 रुपयांवर पोहोचला आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 49580 असून, 24 कॅरट सोन्याचा दर 54 हजार 90 रुपये इतका आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 49580 आणि 54 हजार 90 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली असून, चांदीचे दर किलोमागे तब्बल तीन हजारांनी वाढले आहेत. आज राज्यात चांदी प्रति किलो सत्तर हजारांवर पोहोचली आहे.
एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे जसा सर्वच क्षेत्राला फटका बसला होता. तसाच फटका हा सोन्याच्या व्यवसायाला देखील बसला होता. मार्केटमध्ये पैसाच नसल्याने मागणी घटली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. जानेवारी 2022 पासून मागणी वाढू लागल्याने सोन्याच्या दरात देखील तेजी दिसू लागली आहे. भारत हा चीन नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.
GST स्लॅबमध्ये लवकरच मोठ्या बदलाची शक्यता; ‘अशी’ असेल नवी रचना