Gold Sliver Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने, चांदीच्या दरात (Gold Sliver Price) घसरण दिसून येत आहे. जागतिक बाजारात सुरू असलेल्या चढ-उताराचा परिणाम हा भारतीय सराफा बाजारावर देखील होत असल्याचे पहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (mx) ने दिलेल्या माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर 47,500 रुपये प्रति तोळा असून, 24 कॅरट सोन्याचे दर (Gold Price) प्रति तोळा 51,810 रुपये इतके आहेत. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,500 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,810 रुपये आहेत. अहमदाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,320 रुपये इतके असून, 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,540 रुपये इतके आहेत. सोन्याच्या किमती या दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याची किंमत ही सोने अधिक दागिण्याच्या घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्यामुळे भावात शहारानुसार तफावत आढळून येते.
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,500 रुपये तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,810 रुपये आहेत. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 580 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचे दर हे प्रति तोळा 51 हजार 8 90 रुपये आहेत. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51 हजार 8 90 रुपये आहेत. तर एक तोळा 24 कॅरट सोन्याच्या खरेदीसाठी 51 हजार 8 90 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 520 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51 हजार 840 रुपये आहे. तर आज चांदीचा दर प्रति किलो 62 हजार 500 रुपये एवढा आहे.
यंदाच्या अक्षय तृतियेला सोन्यामध्ये मोठी उलाढाल पहायला मिळाली. कोरोना पूर्व काळाची तुलना केली तर चालू वर्षात सराफा व्यवसायातील उलाढाल तब्बल 15 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र असे असून देखील सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे सोन्याचे वाढलेले दर हे आहे. कोरोना पूर्व काळात म्हणजे 2019 मध्ये सोन्याचे दर हे 31 ते 32 हजार रुपये तोळा होते. मात्र यंदा त्यामध्ये वाढ झाली असून, ते 47 हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. वाढलेल्या दरांमुळे सराफा व्यवसाय वाढला मात्र सोन्याची मागणी घटल्याची प्रतिक्रिया सराफा व्यापारी देत आहेत.