नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023) मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) सरप्राईज गिफ्ट मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाला त्यांच्या एकूण पगाराने गुणले जाते, त्याआधारे फिटमेंट फॅक्टर ठरविल्या जाते. फिटमेंट फॅक्टर हे मूळ वेतन ठरविण्याचे एक सामान्य मूल्य आहे. किमान वेतन (Minimum Wage) अर्थात मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या किमान वेतन 18,000 रुपये आहे. आता त्यात वाढ होऊन किमान वेतन 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकेल.
सध्या फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे. एका उदाहरणाने हे समजून घेऊयात. एखाद्या व्यक्तीला 15,500 रुपये किमान वेतन आहे. तर त्याचे एकूण वेतन 15,500*2.57 म्हणजे 39,835 रुपये होईल. सहाव्या CPC मध्ये फिटमेंट रेशो 1.86 टक्के ठेवण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.
कर्मचारी फिटमेंट फॅक्टर वाढवून तो 3.68 टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 18,000 रुपयांहून 26,000 रुपये होईल. कर्मचाऱ्यांच्या संघटना काही वर्षांपासून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढीची मागणी करत आहेत. महागाई भत्त्यासह मूळ वेतनात वाढीची मागणी करण्यात आली आहे.
अर्थमंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हाऊस रेंट अलाऊन्सशी (HRA) संबंधित नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले. त्यानुसार, काही प्रकरणात केंद्रीय कर्मचाऱ्यांना एचआरए मिळणार नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने सरकारी घरचं दुसऱ्याला देत असेल तर त्याला नियमांचा फायदा मिळणार नाही.
कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची अनेक महिन्यांपासून मागणी करण्यात येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी डीए वृद्धीची मागणी लावून धरली होती. परंतु, दुसऱ्या सहामाहीपासून आतापर्यंत महागाई भत्ता मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.