नवी दिल्ली : नोकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाने पीएफवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. म्हणजे प्रोव्हीडंड फंडावर आता जादा व्याज मिळणार आहे. सरकारने ईपीएफ व्याज दराला आर्थिक वर्ष 2022-23 साठी 8.10 टक्क्यांवरून 8.15टक्के केले आहे, या व्याजदरामुळे ईपीएफ सदस्यांना लाभ मिळणार आहे, गेल्यावर्षी सीबीटीने ईपीएफच्या दरांना गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आणले होते. तरीही आर्थिक वर्ष 2018-19 च्या 8.55 टक्के व्याज दरापेक्षा आताचे व्याज दर कमी आहे. गेली दोन वर्षे ईपीएफओ सीबीटीची गेली दोन वर्षे बैछक सुरू होती.
गेल्यावर्षी 40 वर्षातील सर्वात कमी व्याजदर
गेल्यावर्षी सरकारने गेल्या 40 वर्षातील सर्वात कमी व्याज देण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2021-22 साठी 8.1 टक्के व्याज देण्यात आले होते. या आधी ते 8.5 टक्के होते. साल 1977-78 मध्ये व्याजदर 8 टक्के होते, त्यानंतर प्रत्येक वेळी 8.25 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 8.65 टक्के, 2017-18 मध्ये 8.55 टक्के , 2016-17 मध्ये 8.65 टक्के आणि आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 8.8 टक्के व्याज मिळाले होते.
7 कोटीपेक्षा जास्त सदस्य
सध्या ईपीएफओचे सात कोटीपेक्षा जास्त सदस्य आहेत. ज्यांना वाढलेल्या व्याज दराचा फायदा मिळणार आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात ईपीएफओने भविष्य निधी अकाऊंटमध्ये एकूण 14.86 लाख सदस्य जोडले होते. एकूण मिळून सुमारे 7.77 लाख नवीन सदस्य पहिल्यांदा ईपीएफओच्या लाभात समाविष्ठ झाले आहेत. या महिन्यात केवळ 3.54 लाख सदस्य ईपीएफओमधून बाहेर पडले, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी घसरण आहे.
कुठे लावतो ईपीएफओ पैसा ?
कर्मचारी भविष्य निधी संघटन ( EPFO) प्रोव्हीडंट फंड खात्यात जमा होणाऱ्या नोकरदारांच्या पैशाला वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये गुंतवित असतो. या इन्वेस्टमेंटमुळे होणाऱ्या फायद्याचा एका हिश्शाला व्याजाच्या रूपात नोकरदारांना वाटला होत्या. EPFO एकूण डिपॉझिटच्या 85 टक्के हिस्सा डेट स्कीममध्ये गुंतवत असतो. यात गवर्नर्मेंट सिक्योरिटीज आणि बॉण्डचा समावेश आहे. यात एकूण 36,000 कोटीची गुंतवणूक होते. उरलेल्या 15 टक्के हिश्याला ETF ( Nifty & Sensex ) मध्ये गुंतवले जाते, डेट आणि इक्वीटीच्या आधारे झालेल्या कमाईतून पीएफचे व्याज निश्चित केले जाते.