नवी दिल्ली : सध्या बॅंकेत ठेवल्या जाणाऱ्या एफडीवरील व्याजदरात बॅंकातर्फे वाढ केली जात आहे, एकीकडे गृह कर्ज महाग झाले जात असताना आणि इएमआयचे ( EMI ) हप्ते भरणे अवघत झाले असताना दुसरीकडे सरकारने फिस्क्ड डिपॉझिटचे ( fixed deposit ) व्याजदर मात्र वाढविले आहे. त्यामुळे बॅंकांमध्ये ( BANK ) ज्यांची एफडी आहे त्यांचा मात्र चांगलाच फायदा होणार आहे. आरबीआय मागच्या काही दिवसांपासून वाढती महागाई कमी करण्यासाठी उपाययोजना करीत आहे. त्यामुळे एफडीवरील व्याज दरात वाढ झाली आहे.
आरबीआयच्या धोरणामुळे कर्ज महाग होत असल्याने घराचे हप्ते भरणे अडचणीचे ठरले आहे, दुसरीकडे बॅंकेत जमा असलेल्या रोख रकमेवरील व्याज दरात मात्र वाढ केली जात आहे. अलिकडेच एचडीएफसी बॅंकेने एफडी वरील व्याज वाढविल्यानंतर आता आयसीआयसीआय बॅंकेने आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे, बॅंकेच्या वतीने 2 कोटी ते 5 कोटी रूपायांपर्यंत एफडीवरील व्याज दरात वाढ केली आहे.
आयसीआयसीआय बॅंक
नव्या निर्णयानंतर आयसीआयसीआय बॅंकेने 4.7 टक्क्यांपासून 7.5 टक्क्यांपर्यंत व्याजदरात वाढ केली आहे. तसेच आयसीआयसीआय बॅंकेने छोट्या कालावधी पासून ते मोठ्या कालावधीसाठी व्याज उपलब्ध केले आहे. ग्राहक आता या वाढलेल्या व्याजदराचा फायदा घेऊ शकणार आहे. आयसीआयसीआय बॅंकच्या वतीने दिले जाणारे व्याजदर अशा प्रकारचे आहेत. हे व्याज दर किमान दोन कोटी रूपये आणि कमाल पाच कोटी रूपयांच्या सिंगल डिपॉझिट एफडीवर उपलब्ध आहे. हे एफडीवरील व्याजदर 23 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
येस बॅंकेचीही एफडी व्याजदरात वाढ
येस बँकेने 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने व्याजदर 0.25 बेसिस पॉइंटवरून 0.50 बेसिस पॉइंटपर्यंत वाढवले आहेत. बँकेने म्हटले आहे की नवीन दर 21 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत. येस बॅंकेने 25 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. 36 महिन्यांच्या कालावधीच्या एफडीवर 8 टक्के व्याज दिल्याचे येस बँकेने म्हटले आहे. येस बॅंकेने सांगितले की 181 ते 271 दिवसांच्या कालावधीसाठीच्या एफडीवर 5.75 च्या ऐवजी आता 6 टक्के व्याज दिले जाईल. तसेच या बॅंकेने 272 दिवसांपासून ते एक वर्षांच्या कालावधीसाठी 6.25 टक्के व्याजदराची घोषणा केली आहे. हा व्याजदर पूर्वी सहा टक्के होता. यापूर्वी एसबीआय, एचडीएफसी, बॅंक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय आदी बॅंकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली होती. व्याजदराच्या सविस्तर माहितीसाठी बॅंकेच्या वेबसाईटला भेट द्यावी किंवा थेट नजिकच्या बॅंकेत जाऊन चौकशी करावी.
आयसीआयसीआय बॅंकच्या एफडीवरील व्याजदर
7 दिवस ते 14 दिवस – 4.75%
15 दिवस ते 29 दिवस – 4.75%
30 दिवस ते 45 दिवस – 5.50%
46 दिवस ते 60 दिवस – 5.75%
61 दिवस ते 90 दिवस – 6.00%
91 दिवस ते 120 दिवस – 6.50%
121 दिवस ते 150 दिवस – 6.50%
151 दिवस ते 184 दिवस – 6.50%
185 दिवस ते 210 दिवस – 6.65%
211 दिवस ते 270 दिवस – 6.65%