नवी दिल्ली : गुगल पे वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आले आहे. युझर्ससाठी गुगलने जबरदस्त फीचर आणले आहे. युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म गुगलपेने (Google Pay) युझर्ससाठी मोठी सोय केली आहे. त्यामुळे युझर्सला युपीआय पेमेंट करणे अधिक सोपे झाले आहे. या फिचरच्या वापरामुळे एक निश्चित रक्कम त्यांना हस्तांतरीत करता येईल. त्यासाठी त्यांना पिनचा अडथळा नसेल. युझर्सला विना पिन त्यांना इतक्या रुपयांचा व्यवहार बिनदिक्कतपणे करता येईल. आरबीआयच्या पुढाकाराने अनेक युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म (UPI Payment Platform) अशी सुविधा देत आहेत.
विना पिन करा पेमेंट
दैनंदिन चीजा खरेदीसाठी, कमी किंमतीच्या वस्तू खरेदीसाठी या फीचरचा वापर करता येईल. गुगल पे युझर्ससाठी युपीआय पेमेंट करणे आता अधिक सोपे झाले आहे. कंपनीने त्यांच्या ॲपवर युपीआय लाईट (UPI Lite) फीचर सुरु केले आहे. आता युझर्स विना पिन (UPI PIN) 200 रुपयांपर्यंतचे पेमेंट सहज करु शकतील. नुकतेच पेटीएम (Paytm) आणि फोनपे (PhonePe ) ने या फीचरची सुरुवात केली आहे.
युपीआय लाईटचा वापर
युपीआय लाईट सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कमी मूल्याधारीत युपीआय पेमेंट गतीने आणि सहज करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. युपीआय लाईटच्या मदतीने दररोजचे छोटे-छोटे व्यवहार एकाच क्लिकमध्ये सहज करता येतात.
200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना पिन
तुम्हाला मोबाईलमध्ये गुगलचे हे लाईट व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल. युपीआय लाईट वॉलेट युझर्सला याच्या मदतीने 200 रुपयांपर्यंतचे तात्काळ पेमेंट करता येईल. 200 रुपयांपर्यंतच्या व्यवहारासाठी कोणताही पिन देण्याची गरज नाही. यामुळे पेमेंटची प्रक्रिया सोपी आणि गतिमान होईल. एकावेळी या प्लॅटफॉर्मवर दोन हजार रुपये जमा करता येतील. 24 तासात तुम्हाला युपीआय लाईटच्या माध्यमातून 4 हजार रुपये खर्च करता येतील.
असे करा Google Pay ॲक्टिव्ह