नवी दिल्ली : तुम्ही ‘गूगल पे’चे (GOOGLE PAY) नियमित वापरकर्ते असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही मोबाईल फोनच्या माध्यमातून खरेदीसाठी गूगल पेच्या माध्यमातून पैसे पाठवत होतात. खरेदीनंतर एका क्लिकवर पेमेंटही करत होता. आता अन्य बँकाप्रमाणे तुम्ही गूगल पेचे क्रेडिट कार्ड (GOOGLE PAY CREDIT CARD) बनवू शकतात. ‘गूगल पे’ने आपल्या ग्राहकांसाठी खास ही सेवा उपलब्ध केली आहे. गूगल पेने अन्य बँकांसोबत सहकार्यात्मक भागीदारी करून ग्राहकांना नवी भेट उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार गूगल पे क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू शकतात आणि लोन वरही खरेदीचा मनमुराद आनंद लुटू शकतात. गूगल पे द्वारे नव्या सेवेसाठी अनेक बँकासोबत सहकार्यात्मक भागीदारी करण्यात आली आहे.
तुम्ही ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड स्विकारल त्या बँकेच्या खात्यातून पैसे वजा केले जातील. ट्रान्झॅक्शन गूगल पेच्या माध्यमातून होईल. मात्र, पैसे कार्डमधून कपात केले जातील.
टाटा समुहाकडून लवकरच UPI अॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर
UPI पेमेंट करताना रहा सावधान, नाहीतर व्हाल कंगाल; सुरक्षीत पेमेंट हीच खात्यातील रकमेची हमी