हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनने (HDFC) मंगळवारी ग्राहकांसाठी (Consumer) झटपट गृहकर्ज (Home Loans)योजना आणली आहे. विशेष म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला बँकेच्या पाय-या झिजवायच्या नाहीत. तर तुमचे सोशल मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही हे कर्ज अवघ्या दोन मिनिटात प्राप्त करु शकतात. अर्थात बँकेच्या पात्रता यादीत तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. झटपट कर्ज, द्या कागदपत्र पटपट असा काहीसा हा मामला आहे. तुम्ही केवळ कागदपत्रांसाठी खटपट करायची आहे. त्यानंतर एचडीएफसी बँक तात्काळ गृहकर्ज मंजूर करेल. बँकेने त्याला स्पॉट ऑफर असे नाव दिले आहे. त्यामुळे कर्जदाराला अवघ्या दोन मिनिटांत कर्ज मंजुरीचा संदेश व्हॉट्सअप या सोशल मीडियावर प्राप्त होईल. आता बँक दारी नाहीतर थेट मोबाईलमधून तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार आहे, तुम्हालाही या गृहकर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रक्रियेच्या या काही पाय-या पूर्ण करुन तुम्ही सहज गृहकर्ज मिळवू शकता.
चला तर ही प्रक्रिया समजून घेऊयात. सर्वात अगोदर ग्राहकाला गृहकर्ज घेण्यासाठी + 91 98670 00000 या क्रमांकावर व्हॉट्सअप मॅसेज करावा लागेल आणि काही आवश्यक माहिती द्यावी लागेल. ग्राहकाने दिलेल्या माहितीची छाननी केल्यानंतर ग्राहक कर्ज योजनेसाठी पात्र आहे की नाही याची खात्री करण्यात येईल.
पडताळणीनंतर पात्र ग्राहकाला तात्काळ तात्पुरते गृहकर्ज मंजुरीचे पत्र व्हॉट्सअपवर देण्यात येईल. आता एक अट मात्र नक्की आहे, ती म्हणजे ही ऑफर केवळ वेतनधारी ग्राहकांसाठी आहे. पगारदार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. तर वाट कसली बघता, चला दोन मिनिटांत गृहकर्जाची पूर्ण प्रक्रिया पाहुयात…