मुंबई : देशावर गेले दोन वर्ष कोरोनाचे (COVID-19) संकट होते. कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमवला, तर अनेकांना कोरोनातून बरं होण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागले. ज्यांनी -ज्यांनी कोरोनाचा समाना केला, कोरोनातून बरे होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले त्यांच्या मनात आपणही एखादा आरोग्य विमा (Health Insurance Policy) काढला असता तर बरे झाले असते असा प्रश्न आला नसेल तरच नवल. कोरोना (Corona) काळापासून आरोग्य विम्याबाबत मोठी जनजागृती झालेली दिसून येत आहे. सध्या आरोग्य विम्याला मोठी मागणी आहे. जर तुम्हाला देखील आरोग्य विमा खरेदी करायचा असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आरोग्य विमा काढताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असतात. त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. सोबतच असे देखील काही उपचार असतात ज्यांचा आरोग्य विम्यात समावेश होत नाही. आपण अशाच काही उपचारांबाबत आज माहिती जाणून घेणार आहोत, ज्याचा समावेश हा आरोग्य विम्यात होत नाही.
सर्वसाधारणपणे आरोग्य विम्यात गरोदरपणा संदर्भातील कोणत्याही समस्यांचा समावेश केला जात नाही. गर्भधारणेशी संबंधित काही समस्या असेल, किंवा बाळाचा जन्म असेल या संदर्भातील कुठल्याही खर्चाचा समावेश हा आरोग्य विम्यात येत नाही. तुम्ही जर विमा काढला असेल तरी देखील गरोदरपणाशी संबंधित कोणतेही उपचार असतील त्याचा खर्च तुम्हाला करावा लागतो.
तुम्ही जो आरोग्य विमा काढला आहे, त्यामध्ये विविध शस्त्रक्रियांचा समावेश होतो. मात्र त्यामध्ये कॉस्मेटिक सर्जरी ( सुंदर दिसण्यासाठीची शस्त्रक्रिया) चा समावेश होत नाही. तुम्ही जरी आरोग्य विमा काढला असेल तरी देखील कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे.
तुम्ही ज्या दिवशी विमा खरेदी करता, त्या दिवसापासून तुम्हाला विम्याचे कवच मिळते. तिथून पुढे जे देखील आजार तुम्हाला होतात. त्या आजारावरील उपचाराचा खर्च हा विम्याच्या रकमेतून मिळतो. मात्र जर तुम्हाला विमा काढण्यापूर्वीच काही आजार असेल तर त्याच्या उपचाराचा खर्च हा आरोग्य विम्यातंर्गत येत नाही. हे लक्षात घ्यावे.
जर तुम्हाला कान, डोळे किंवा दातांशी संबंधित काही समस्या असेल तर अनेक आरोग्य विम्यात या संमस्यांच्या उपचारावरील खर्चाचा समावेश नसतो. जर तुम्हाला या समस्यांवरील उपचाराचा देखील खर्च हवा असेल तर तुम्हाला या सर्व आजारांवरील उपचाराचा खर्च देणारा विमा खरेदी करावा लागतो.
RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय
Share Market Updates : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा