नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : आता एटीएममधून कॅश काढण्यासाठी एटीएम कार्डची काही आवश्यकता नाही. हिताची पेमेंट सर्व्हीसेसने ( Hitachi Payment services ) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया ( NPCI ) सोबत पहिले व्हाइट लेबल युपीआय एटीएम लॉंच ( White-label UPI ATM ) केले आहे. या एटीएम सुविधेने एटीएम कार्ड शिवाय कॅश काढण्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे या ओन्ली युपीआय-व्हाईट लेबल एटीएमवर घोटाळेबाजांना स्किमिंग करता येणार नसल्याने फसवणूकीचा धोका टळणार आहे.
जेथे पारंपारिक बॅंकींग पायाभूत सुविधा आणि कार्ड एक्सेसची मर्यादा आहे तेथे मनी स्पॉट युपीआय एटीएम सुविधा बॅंकींग सेवा वापरणे सोपे करणार आहे असे हिताची म्हटले आहे. हिताची पेमेंट सर्व्हीसेस एकमेव व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर असून जी कॅश डीपॉझिटची सुविधा देखील उपलब्ध करते. या सेवेचा वापर 3000 हून अधिक एटीएम लोकेशनवर वापरली जाते.
हिताची म्हटले आहे की युपीआयने देशात सर्वाधिक वाढ होणारे पेमेंट सोल्युशन आहे. डीजिटल देवाण-घेवाणीत याचा वाटा 50 टक्क्यांहून अधिक आहे. हिताची पेमेंट सर्व्हीसेसच्या कॅश बिझनेसचे एमडी आणि सीईओ सुमिल विकमसी यांनी म्हटले आहे की देशाच्या नागरिकांसाठी इनोटिव्ह बँकिंग सेवा सुलभतेने वापर होण्यासाठी युपीआय एटीएम आमची तांत्रिक क्षमता सिद्ध झाली आहे. नव्या सुविधेत कोणत्याही बॅंक ग्राहकाला क्युआर आधारित युपीआय कॅश विदड्रॉअलची सुविधा मिळत आहे.
युपीआय एटीएमच्या लॉंचिंग पारंपारिक एटीएमच्या तुलनेत युपीआयची सुविधा आणि सुरक्षेला एकत्र मिलाफाने बॅंकींग सेवेमध्ये नवा पर्याय उपलब्ध केला असल्याचे एनपीसीआयने म्हटले आहे. या नव्या सुविधेमुळे भारताच्या दुर्गम भागातही फिजिकल कार्डच्या गरजेशिवाय कॅश मिळण्यासाठी इस्टंट एक्सेससाठी डीझाईन केले आहे.