नवी दिल्ली : लग्न आणि घर या आयुष्यातील घटना मानण्यात येतात. भारतीयांसाठी या दोन्ही घटना भावनात्मक आहेत. आपलं स्वतःचं घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असते. पण अनेकदा नैसर्गिक आपत्ती, चोरी, दरोडा यासारख्या अप्रिय घटन पण घडतात. अशावेळी घराचे आणि घरातील बेशकिंमती वस्तू, संपत्तीचे नुकसान होते. मानसिक ताप तर होतोच पण आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळेच गृह विमा घेण्याकडे कल वाढत आहे. गृह विमा (Home Insurance) केवळ घर मालकासाठीच फायदेशीर असतो, या समजुतीला छेद देणारी ही माहिती आहे. भाडेकरुने विमा घेतल्यास त्याला पण फायदाच होईल.
भाडेकरुला गरज काय
घरमालकाने गृह विमा काढणे ही सामान्य बाबा आहे. पण भाडेकरुला विमा घेण्याची गरज काय, असा सवाल तुम्हाला पडला असेल. भाडेकरुचे पण अनेक मौल्यवान सामान, रोख रक्कम, सोने-चांदी आभुषणे, दागिने, गॅझेट्स, स्वयंपाक गृहातील भांडे, किंमती वस्तू अशा संकट काळात लंपास होऊ शकतात अथवा नैसर्गिक आपत्तीत हिरावून जाऊ शकतात. अशावेळी घरमालकाचा गृह विमा त्याच्या काय कामास येईल?
केव्हा होईल फायदा
नैसर्गिक संकट जसे पूर, भूकंप, वादळ, जोरदार पाऊस, चोरी, दरोडा, आग आणि इतर संकट काळात जर घरातील वस्तू जळाल्या, त्यांना नुकसान झाले तर या विम्यामुळे तुम्हाला भरपाईसाठी दावा सांगता येईल. त्यातून वस्तू परत येणार नाही, पण तुमचे नुकसान भरुन निघेल.
अॅड ऑन
तुम्ही गृह विम्यात अॅड ऑनचा वापर करु शकता. त्यासाठीचा पर्याय पॉलिसी खरेदी करताना निवडता येतो. यामध्ये घराचे नुकसान, मागील बाजूचे नुकसान, दुरुस्ती आणि इतर अनेक बारीक-सारीक खर्चाच्या तपशीलाचा समावेश होतो.
पॉलिसी नव्हे पॅकेज
पॉलिसी घेताना पॅकेज घेणे फायदेशीर ठरते. स्टँडअलोन होम इन्शुरन्स पॉलिसी न घेता इतर सेवांचा पण समावेश करुन घ्या. उदाहरणार्थ रेफ्रिजरेटर, वाशिंग मशिन, एलईडी टीव्ही आणि लॅपटॉप, इलेक्ट्रिक गॅझेट, मॅकेनिकल उपकरणे यांचे कव्हरेज घ्या. पॅकेज पॉलिसीत देशातंर्गत कुठे फिरायला गेले असताना व्यक्तिगत सामानाची चोरी, घरावर दरोडा अशा अतिरिक्त सेवाचा फायदा घेता येईल.
या गोष्टींचे ठेवा ध्यान