मुंबई: कोरोनाच्या (Corona)दुसऱ्या लाटेत गोविंदला नोकरी (Job) गमवावी लागल्यानं त्यांना गृह कर्जाचा हप्ता भरता आला नाही. आता त्यांच्या घरावर बँकेकडून (bank) लिलावाची नोटीस लावण्यात आली आहे. हे फक्त गोविंद यांचं एकट्याचे दु:ख नाही. कोरोना महामारीत अनेक जणांची नोकरी गेली. नोकरी नसल्यानं गृह कर्जाचा हप्ता भरणं अवघड झाल्यानंतर बँकांची नोटीस आली. आरबीआयच्या अहवालानुसार 31 मार्च, 2021 पर्यंत 22.4 लाख कोटी गृहकर्जाचं वाटप करण्यात आलंय. सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांच्या कर्जात एनपीए म्हणजेच बुडीत कर्जाचा वाटा 6.1 टक्के आहे.सप्टेंबर 2022 मध्ये एनपीएमध्ये 8.1 टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.
जर तुम्ही घराचा हप्ता भरू शकत नसल्यास तुमच्या समोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत? ते आपण पाहूयात. आरबीआयच्या नियमानुसार घराचा हप्ता 90 दिवसांच्या आत न भरल्यास बँक तुमचं कर्ज एनपीए म्हणजेच बुडीत कर्ज म्हणून घोषित करते. अशावेळी बँका तुम्हाला कर्जाची पूर्ण रक्कम भरण्यासाठी तगादा लावतात. जर तुम्ही हप्ता भरत नसल्यास बँका तुम्हाला दिवाळखोर म्हणजेच डिफॉल्टर म्हणून घोषित करतात. वस्तूत: बँक हप्ता थकवल्याचे प्रकरण फार गांभीर्यानं घेत नाही. मात्र, तुमच्यावर कर्जाच्या परतफेडीसाठी दबाव आणतात. 2002 मध्ये आलेल्या सरफेसी कायद्याअंतर्गत बँकांना थकित रक्कम वसुली करण्यासाठी संपत्ती जप्त करून विकण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्जाच्या रक्कमेची परतफेड करणे शक्य होत आहे.
टॅक्स एक्सपर्ट बळवंत जैन म्हणतात घराचा हप्ता थकल्यास बँक लगेच कडक पावलं उचलत नाहीत. कारण संपत्तीची खरेदी विक्री करणे हे बँकेचे काम नाही. कर्जदाराकडून कर्जाची परतफेड योग्य काळात करून घेणं हेच त्याचे मुख्य काम आहे. गहाण ठेवलेलं घर विकण्याआधी बँका इतर व्यावहारिक पर्यायाचाही विचार करत असतात. जप्त संपत्तीची विक्री केल्यानंतरही कर्जाची परतफेड होत नसल्यास उर्वरित रक्कम तुम्हाला भरावी लागते. याऊलट जर कर्ज परतफेड केल्यानंतर रक्कम उरत असल्यास तुम्हाला उर्वरित रक्कम देण्यात येते. अशावेळी तुम्हाला इन्कम टॅक्ससुद्धा भरावा लागतो. गृह कर्ज घेतल्यानंतर पाच वर्षाच्या आत घर विक्री केली असल्यास 80 सी अंतर्गत अगोदर घेतलेले सर्व लाभ परत करावे लागतात,असंही बळवंत जैन यांनी सांगितलंय.
नियमानुसार कर्जाची परतफेड आणि डिफाल्टची सूचना CIBIL सारख्या संस्थांना देण्यात येते. त्यामुळे CIBIL च्या रिपोर्टमध्ये तुमची डिफॉल्टर म्हणून नोंद करण्यात येते. त्यामुळे तुमचे पत मानांकन म्हणजेच क्रेडिट हिस्टी देखील खराब होते. त्यानंतर तुम्हाला नवीन कर्ज मिळणं जवळपास दुरापास्त होते. कर्जाची परतफेड होत नसल्यास कायद्यानुसार बँका घराचा ताबा घेतात. अशावेळी कर्जदारानं बँक कर्मचाऱ्यांना विरोध करू नये. अशावेळी तुमची वागणूक सौहार्दपूर्ण असावी. चांगल्या वागणुकीमुळे बँक अधिकारी तुमच्या कर्ज प्रकरणाकडे सहानभूतीने पाहतात. चांगल्या वागणुकीमुळे संकटकाळात बँक अधिकारी मदत करण्यासाठी पुढाकार घेतात. साधारणपणे बँका घर जप्त करून विक्री करण्यापेक्षा व्यावहारिक पर्यायाचा शोध घेत असतात.
कर्ज परतफेड करण्यासाठी बँकेकडून करण्यात येत असलेली पद्धत चुकीची वाटत असल्यास बँक अधिकाऱ्यांशी संपर्क करा. अशावेळी बँकेकडून संपत्ती विकण्यापेक्षा तुम्ही स्वत: संपत्तीची विक्री केल्यानं तुम्हाला जास्त किंमत मिळू शकते. कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमच्याकडे रक्कम उरत असल्यास त्याच शहरात लहान घर खरेदी करा, किंवा आपण एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी राहात असताल तर दूर ठिकाणी घर घ्या. तिथं कमी किंमतीत घर मिळू शकतं. जर तुम्ही एखादं घर किंवा दुकान कर्ज घेऊन खरेदी करत असाल तर कर्जाची रक्कम तुमच्या आवाक्यात असावी कर्ज घेतल्यानंतर परतफेडीसाठी प्लान A आणि प्लान B तयार ठेवा. गृह कर्जाची परतफेड न करणं ही गंभीर बाब आहे. त्यामुळे गृह कर्ज परतफेडीसाठी सर्वप्रकारे प्रयत्न करा.
कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा