बचत ही काळाची गरज मानली जाते. संकट काळात तुम्ही केलेली बचतच तुमच्या कामी येते. मात्र नुसतं बचत करूनच चालत नाही, तर बचत केलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवता देखील आला पाहिजे. गुंतवणुकीतून (Investment tips) चांगला परतावा (Refund) मिळाल्यास तुमची बचत वाढते. पुढे संकट काळात हीच बचत तुमच्या कामाला येते. गुंतवणुकीचे सामान्यपणे दोन प्रकार पडतात. एक अशी गुंतवणूक असते ज्या गुंतवणुकीमध्ये रिस्क काहीच नसते. मात्र परतावा कमी मिळतो. यामध्ये पोस्टाच्या विविध योजना, बँकेची मुदत ठेव योजना आणि यासारख्या इतर योजनांचा समावेश होतो. दुसरी गुंतवणूक अशी असेत की ज्यामध्ये रिस्क प्रचंड प्रमाणात असते, मात्र मग परतावा देखील मोठ्याप्रमाणात मिळतो. गृहिणी (Housewives) देखील बचत करत असतात. गृहीणींना घरकामाच्या बदल्यात पैसे मिळत नाहीत. मात्र त्यांना ठराविक वेळी पालक आणि पतीकडून पैस मिळत असतात. मिळालेल्या पैशांमधूनच त्या काही पैशांची बचत करतात. त्यांनी अशापद्धतीने वाचवलेल्या पैसा त्या कुठे गुंतवू शकता हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
म्युचुअल फंड : म्युचुअल फंड गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंडमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. म्युचुअल फंडमध्ये महिन्याला तुम्ही 100 रुपयांची देखील गुंतवणूक करू शकता. त्यामुळे म्युचुअल फंड हा गृहिणीसाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरतो.
बॉन्डमध्ये गुंतणूक : महिला बॉन्डमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. बॉन्डमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक आधारावर व्याज मिळते. बॉन्डमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षीत मानण्यात येते. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या गुंतवणुकीमधून परतावा देखील चांगला मिळतो.
पीपीएफमध्ये गुंतवणूक: पीपीएफ अर्थात पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा महिलांना लाँग टर्म गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. वर्षभरात तुम्ही पाचशे रुपयांची देखील गुंतवणूक पीपीएफमध्ये करू शकता. योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो. एक मोठी रक्कम तुमच्या हातात येते. ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी करू शकता.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट : नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये देखील महिला गुंतवणूक करू शकतात. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असतो. योजनेवर सध्या वार्षिक आधारावर 6. 8 टक्के व्याज देण्यात येत आहे. यातून चांगला परतावा मिळत असल्याने ही एक गुंतवणुकीसाठी चांगली योजना आहे.
‘Interest only’ होमलोनचं चक्रव्यूह; बँकांच्या ऑफरमागील सत्य समजून घ्या
तुमचा आपत्कालीन निधी आहे तर या चुका टाळा; नाही तर मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार