जगातील सर्वात श्रीमंत (Rich) व्यक्तींपैकी एक असलेल्या इलेक्ट्रिक वाहन (Electric vehicle) क्षेत्रातील आघाडीच्या टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk)यांनी पुण्यातील एका इंजिनिअरशी मैत्री केली आहे. एवढेच नाही तर ते नियमीत ट्विटरवर गप्पा देखील मारतात. हे वाचून विश्वास बसणार नाही. मात्र ही घटना घडली आहे, सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा या तरुणाच्या ट्विटला मस्क यांचा रिप्लाय आला तेव्हा या तरुणाला देखील मोठा धक्का बसला होता. प्रणय पाटोळे असे या इंजिनिअर तरुणाचे नाव आहे. प्रणय सध्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. याबाबत बोलताना प्रणय याने हिंदूस्थान टाइम्सला सांगितले की, मला सुरुवातीला खात्री नव्हती की, जागातील टॉप श्रीमंतांपैकी एक असलेले मस्क आपल्या ट्विटला रिप्लाय देतील. पण जेव्हा त्यांनी ट्विटला रिप्लाय दिला तेव्हा मला आर्श्चयाचा धक्काच बसला. तो दिवस माझ्यासाठी स्पेशल होता. क्रिप्टो करन्सीबाबत चर्चा सुरू होती. या चर्चेत मी देखील भाग घेतला होता. मी क्रिप्टोबाबत केलेल्या एका ट्विटला मस्क यांचा रिप्लाय आला.
प्रणय पुढे बोलताना म्हणाला की, एलन मस्क यांनी जेव्हा पहिल्यांदा माझ्या ट्विटला रिप्लाय दिला तेव्हा, माझाही माझ्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही सत्य घटना होती. मस्क यांनी माझ्या ट्विटला रिप्लाय दिला होता. पुढे काही काळ आमची ट्विटरवर कधीकधी चर्चा होत होती. मस्क मला मार्गदर्शन करत होते. ही गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. मात्र त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट होत गेली. आम्ही आता ट्विटरवर नियमित संवाद साधतो.’
Starship is so beautiful ? @elonmusk ? pic.twitter.com/Xyw2UMhVVn
— Pranay Pathole (@PPathole) March 16, 2022
प्रणय एलन मस्कबद्दल बोलताना म्हणतो की, ते अतिशय विनम्र आहेत. आपण टेस्ला सारख्या कंपनीचे सीईओ आहोत, आपला जगातील टॉप श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेळ होतो. याचा जराही अभिमान त्यांना वाटत नाही. ते ट्विटरवर अधिक सक्रिय असतात आणि लोकांशी मुक्तपणे संवाद साधतात. आम्ही ट्विटरवर नियमित संवाद साधत असतो. मी जेव्हा देखील त्यांच्यासाठी ट्विट करतो, तेव्हा ते अवघ्या काही वेळातच माझ्या ट्विटला रिपलाय देतात. आम्ही ट्विटरवर चांगले मित्र आहोत.
Why are people spreading hate against @elonmusk? He’s actually making a difference by providing Starlink Internet service to Ukraine, while at the same time trolling the Russian military. I really love it. It’s hilarious how he is publicly ridiculing Putin. pic.twitter.com/c3qvJiz49U
— Pranay Pathole (@PPathole) March 16, 2022
तुमचे पॅन आधारला लिंक आहे का? नसेल तर आजच लिंक करा, 31 मार्चनंतर होऊ शकते मोठे नुकसान
ग्राहकाभिमुख सेवांनी ग्राहकांचे ‘उज्जीवन’ , उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा नवउपक्रम