संभाजी चव्हाण यांनी वारसापत्र (Heir letter) तयार न केल्यानं कुटुंबात कलह निर्माण झालाय. चव्हाण यांचं निधन होऊन एक वर्षही पूर्ण झालं नसताना संपत्तीच्या वाटपावरून मुलं एकमेकांच्या जीवावर उठलेत. चव्हाण यांच्या निधनानंतर दोन्ही मुलांनी बहिणीला न कळवता संपत्तीचं वाटप करुन घेतलं. मुलगी वर्षानं हिस्सा मागितल्यावर प्रकरण मारहाणीपर्यंत पोहोचले. ही गोष्ट फक्त संभाजी चव्हाण यांच्या कुटुंबाची नाही, देशभरातील लाखो कुटुंबात संपत्तीच्या वाटपावरून कोर्ट कचेरी सुरू आहे. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चनुसार 15 सप्टेंबर, 2021 पर्यंत देशभरात एकूण 4.5 कोटी खटले न्यायालयात (court) प्रलंबित आहेत. यातील दोन तृतियाशं खटले जमीन आणि संपत्तीसंदर्भातील आहेत. यासारख्या प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी अनेक वर्ष ताटकळत राहावं लागतं. सरकारनं (Government)संपत्ती वाटपाबाबत अनेक सुधारणा करुणही अद्याप गोंधळ कायम आहे. मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये किती हक्क असतो. मुलींना आजोबाच्या संपत्तीमध्ये हक्क मिळतो काय? लग्नानंतर मुलींना संपत्तीमध्ये हक्क असतो की नाही ? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
मुलींच्या हक्कासाठी 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 मध्ये बदल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींचा समान हक्क असतो. मुलगी लग्न झालेली असो, विधवा असो , कुमारी असो किंवा परित्यक्ता असो. वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा जन्मापासूनच समान वाटा असतो. हा कायदा 9 सप्टेंबर 2005 मध्ये अस्तित्वात आल्याने मुलीचे वडील 9 सप्टेंबर 2005 पर्यंत हयात असल्यास मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळतो. 2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलीला संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नव्हता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं 2020 मध्ये कायद्यात सुधारणा करत वडिलांचा मृत्यू 9 सप्टेंबर 2005 पूर्वी झाला असल्यासही वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणेच मुलीचा हक्क असेल असे स्पष्ट केलं. मात्र, वडील त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी खरेदी केलेल्या संपत्तीचं वाटप त्यांच्या मर्जीनुसार मुलीला देऊ शकतात किंवा देत नाहीत. मात्र, संपत्तीमध्ये हिश्यात मुलांप्रमाणेच मुलीचाही हक्क कायम आहे.
मुलींच्या हक्कासाठी सर्वोच्च न्यायालयानं सक्षम व्यवस्था तयार केलीय एकत्रित कुटुंब पद्धतीत कर्त्यापुरुषाचा मृत्यू वारसपत्र न करता झाला असल्यास संपत्तीमध्ये मुलांप्रमाणेच मुलीला हिस्सा मिळतो. एवढेच नव्हे तर मुलीला तिच्या चुलतभावांच्या तुलनेत संपत्तीच्या हिस्स्यात प्राधान्य मिळते. हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 लागू होण्याआधी एखाद्या संपत्तीचं वाटप झालं असल्यास त्यावरही हा निर्णय लागू आहे. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा पूर्ण हक्क आहे. यात मुलगी लग्न झालेली असो किंवा नसो किंवा विधवा असो की घटस्फोटीत मुलीचा समान हक्क आहे. मात्र, वडिलांच्या स्वअर्जित संपत्तीमध्ये वडिलांच्या मर्जीनुसार मुलीला हिस्सा मिळतो, असे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता अनिल कर्णवाल यांनी म्हटले आहे.
वडिलांनी जर स्वअर्जित संपत्तीमध्ये मुलीला हिस्सा दिला नसल्यास, मुलीला संपत्तीमध्ये हिस्सा मिळणार नाही. मात्र, वडिलांचा मृत्यू वारसापत्र तयार न करता झाला असल्यास मुलीला संपत्तीत हिस्सा मिळतो. संभाजी चव्हाण यांनी मृत्यूपर्वी वारसापत्र तयार केलं नव्हतं, त्यामुळे कायद्यानुसार वर्षाला संपत्तीमध्ये हिस्सा मिळणार एवढं नक्की.
‘पीएमजेजेबीवाय पॉलिसीधारकांना ‘आयपीओ’त सूट?, अध्यक्षांच्या विधानावर एलआयसीचे स्पष्टीकरण
ITI Conservative Hybrid Fund लाँच, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, 7 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी